शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्तांचे सर्व विभागांना खर्च कपातीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 19:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नुकत्याच पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या सूचना देत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिल्याने अनावश्यक खर्चाच्या कपातीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नुकत्याच पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या सूचना देत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिल्याने अनावश्यक खर्चाच्या कपातीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.पालिकेकडून पदसिद्ध अधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना स्वत:चे खासगी वाहने वापरापोटी तर काही अधिकाऱ्यांना कंत्राटावरील वाहनांच्या वापरापोटी एकरकमी वाहन भत्ता अदा केला जातो. कंत्राटी वाहनांना प्रती दिन ८ तासांप्रमाणे महिन्याकाठी २४ ते ३२ हजार रुपये अदा केले जातात. एखादे वाहन ८ तासांपेक्षा अधिक वेळेसाठी वापरल्यास त्या वाहनाच्या वापरापोटी प्रती किलोमीटर मागे ८ ते १० रुपये अतिरीक्त अदा केले जातात. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न कंत्राटी वाहनांसाठी खर्ची होते. यात पालिकेचे कंत्राटी वाहनांच्या तुलनेत खाजगी वाहनांवर कमी खर्च होत असल्याने आयुक्तांनी कंत्राटी वाहनांच्या वापरावर नियंत्रण आणून त्याचा अत्यावश्यकेतनुसारच वापर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.पालिकेच्या सर्व कार्यालयांत अनेकदा अधिकारी आपल्या जागेवर नसतानाही तेथील पंखे, एसी, बल्ब सुरुच असल्याचे दिसून येते. अशा वीज अपव्ययावर अंकुश ठेवत आयुक्तांनी दिवसा आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करून त्यात बचत करण्याची सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत. जेणेकरुन दरमहिन्याला पालिकेला वीजवापरापोटी येणाऱ्या लाखोंच्या बिलात घट होऊन पालिकेच्या खर्चाची बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील पथदिव्यांचा खर्च नागरी सुविधांच्या माध्यमातुन पालिकेला अदा करावा लागत असल्याने त्यावर सौर ऊर्जेचा पर्याय आयुक्तांनी सुचविल्याचे सांगण्यात येत आहे. पेपरलेस कारभाराचा अधिकाधिक वापर करून कागदाचा वापर कमी करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. यांसह इतर खर्चिक बाबींवर सुद्धा नियंत्रण आणून त्याच्या खर्चात अधिकाधिक कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने सर्व विभागांनी वीजेच्या अनावश्यक वापरावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. दिवसा उजेडात कमी वीजेचा वापर करण्यास सुरुवात झाल्याने आयुक्तांचा बचतीचा आदेश तात्पुरता कि कायमस्वरुपी प्रभावी ठरणार, अशी चर्चा मात्र कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरीकांमध्ये सुरु झाली आहे.पालिकेचे यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारी अनुदानासह मूळ उत्पन्न सुमारे ७५० कोटींचे दर्शविण्यात आले असले तरी ते सत्ताधाऱ्यांकडून दुपटीने फुगविण्यात आले आहे. नागरी सोईसुविधांपोटी होणा-या खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात सतत वाढणारी तुट कमी करण्यासाठी खर्चावरील कपात अत्यावश्यक ठरु लागली आहे. यंदा तर पालिकेच्या सर्वसाधारण फंडातून विकासकामे पार पाडली जात असल्याने भविष्यात पालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक