आईची हत्या करुन पित्यावर खूनी हल्ला करणाऱ्या मुलाला अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: May 11, 2023 21:09 IST2023-05-11T21:08:42+5:302023-05-11T21:09:03+5:30
ठाण्यातील घटना: कासावडवली पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात

आईची हत्या करुन पित्यावर खूनी हल्ला करणाऱ्या मुलाला अटक
ठाणे: उल्हासनगर येथे भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात कौटुंबिक कलहातून संकल्प भाटकर (३१, रा. कोपरी, ठाणे) या पोटच्या मुलानेच आईची हत्या करून पित्यावरही खूनी हल्ला केल्याची संतापजनक घटना ठाण्याच्या कासारवडवली भागात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ससंकल्पला मुंबईतील कुलार् प िरसरातून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
संकल्पने आपल्या आई व िडलांवर चाकूने वार केल्यानंतर मोटार सायकल घेऊन पसार झाला होता. ही माहिती मिळताच व िरष्ठ पाेलीस िनरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी पथक तयार करून त्याला सायंकाळी त्याच्या मुंबईतील येथील सासूरवाडीतून ताब्यात घेतले. संकल्पचे दोन आठवड्यापूर्वी त्याची आई विनीता विलास भाटकर (६६) आणि वडील विलास मुंकुद भाटकर (७१) यांच्यासमवेत भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून गुरुवारी सकाळी तो घोडबंदर रोड येथील आईवडिलांच्या घरी आला होता. यावेळी त्याने सुरीने आई विनिता हिच्या पोटावर तसेच शरीरावर इतर ठिकाणीही वार केले.
त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्याने त्याचे वडील विलास यांच्या मानेवर आ िण शरीराच्या इतर भागावर सुरीने वार करून त्यांनाही गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर संकल्पने मोटार सायकल वरून मुंबईच्या िदशेने पळ काढला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके तयार केली. याप्रकरणी सौरभ भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन त्याला रात्री अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे करीत आहेत.
संकल्पवर सुरु हाेते मनाे िवकारावरील उपचार!
संकल्प हा स्टेरॉईड घेत असल्याने मानसिक रुग्ण आहे व त्याच्याकडे घरातील कांदा कापण्याचा चाकू आहे कुठे मिळून आल्यास, त्यास ताब्यात घ्यावे आणि कासारवडवली पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी, असा मेसेज सकाळी काही काळ साेशल मीडियावर व्हायरल झाल्यानेही पिरसरात भीतीचे वातावरण पसरले हाेते. संकल्पवर मनाे िवकाराचे उपचार सुरु हाेते, अशी मा िहती त्याच्या पत्नीने िदली आहे. त्याला अटक केल्याचे पाेलीस उपायुक्त अमरिसंग जाधव यांनी सांिगतले. मुबंईतील शरीर सौष्ठव स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता, अशी माहितीही समोर आली आहे.