आईला भेटायला आला; सावत्र बापाने जळत्या लाकडाने हाणले

By जितेंद्र कालेकर | Updated: December 27, 2023 21:12 IST2023-12-27T21:12:09+5:302023-12-27T21:12:17+5:30

कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा: मुलगा जखमी

son came to see his mother; stepfather hit him with burning wood | आईला भेटायला आला; सावत्र बापाने जळत्या लाकडाने हाणले

आईला भेटायला आला; सावत्र बापाने जळत्या लाकडाने हाणले

ठाणे: आपल्या आईला भेटण्यासाठी गेलेल्या साहिल दिनेश भोये (२२, रा. विक्रोळी, मुंबई) याच्यावर ठाण्यातील घाेडबंदर भागात राहणारा त्याचा सावत्र पिता दीपक जवाहरलाल शर्मा (३२) याने शिवीगाळ करीत जळत्या लाकडाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या शर्माविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी बुधवारी दिली.

दिनेश याची ४३ वर्षीय आई ही गेल्या १२ वर्षांपासून त्याच्या वडिलांपासून वेगळी राहते. ती शर्मा याच्यासोबत ठाण्यातील घाेडबंदर रोडवरील चिमाचा पाडा भागात राहते. तो आईला भेटण्यासाठी २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गेला. त्यावेळी त्याच्या सावत्र पित्यासह तिघेजण दारु पित होते. त्याला पाहताच आईने शिवीगाळ करीत तो आल्याचे सांगितले.

त्यानंतर शर्मा याने जळणासाठी ठेवलेल्या लाकडांमधील एक लाकूड हातात घेऊन त्याला शिवीगाळी करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या उजव्या डोळयाजवळ लागल्याने त्याने दोन्ही हातांनी बचावाचा प्रयत्न केला. यात त्याच्या उजव्या हातालाही मार लागून ताे जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी २६ डिसेंबर रोजी शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: son came to see his mother; stepfather hit him with burning wood