म्हाडाच्या सोडतीत कही खुशी, तर कही गम; डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात निघाली सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:51 PM2021-10-14T16:51:40+5:302021-10-14T16:51:46+5:30

ठाणे जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार जणांचे अर्ज 

Some happiness, some sorrow in MHADA's Lottery draw in Thane | म्हाडाच्या सोडतीत कही खुशी, तर कही गम; डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात निघाली सोडत

म्हाडाच्या सोडतीत कही खुशी, तर कही गम; डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात निघाली सोडत

Next

ठाणे:  कोकण गृहनिर्माण क्षेत्निवकास मंडळातर्फे कल्याण, व (म्हाडाचा घटक) मिरा रोड, विरार, नवी मुंबई,  सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत गुरुवारी ठाण्यात प्रथमच पार पडली.

यापूर्वीच्या सोडती या मुंबईतच होत होत्या. परंतु यंदा सर्वाधिक २ लाख ४६ हजार ६५० अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणचे नशीब उघडणार हे पाहणो महत्वाचे ठरणार होते. परंतु कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ही सोडत ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात ५०० अजर्दारांचा हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या तोंडावर कुठे हसू तर कुठे निराशा दिसून आली. त्यातही ठाणे  जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार नागरीकांना अर्ज केल्याचे दिसून आले.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ वर्तमान कळावे यासाठी तुतारीच्या निनादात सोडत काढली जात होती. त्यातही जे हजर राहिले त्यांच्यासाठी म्हाडाची ट्रॉफी आणि त्यांचे स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांना आजच्या दिवशी ही घरांची लॉटरी लागली त्यांच्या चेह:यावर आनंद दिसून येत होते. सकाळी १० वाजता घाणोकर नाटय़गृहात ही सोडत काढली गेली. यावेळी ३२ देशातील नागरीक ही सोडत ऑनलाईन पध्दतीने पाहत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार रविंद्र फाटक, मुंबई इमारत पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संगणकीय पध्दतीने सोडत काढण्यात आली. अतिशय पारदर्शक पध्दतीने ही सोडत सुरु असल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या नागरीकांनी सांगितले. तर ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते बाहेर यादी लागण्याच्या प्रतिक्षेत दिसून आले. याठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यातही एकूण ८ हजार ९८४ घरांपैकी ८१२ घरे ही ठाणे  जिल्ह्यात होती. परंतु प्राप्त झालेल्या एकूण २ लाख ४६  हजार ६५० अर्जापैकी ठाणो जिल्ह्यासाठी तब्बल २ लाख ७ हजार नागरीकांनी अर्ज केला असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितिन महाजन यांनी दिली. दरम्यान ठाणो, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांकरिता ही सोडत काढण्यात आली होती.

नाट्यगृहातील वातावरण शांतच-

म्हाडांच्या घरांची सोडत ऑनलाईन असल्याने प्रवेशिकेशी आता सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे मोजून नागरिक नाट्यगृहात आल्याने तेथील वातावरण बऱ्यापैकी शांत होते. एकीकडे लॉटरी काढली जात होती. पण, सोडत ऑनलाईन पध्दतीने असल्याने नागरिकांनी घरूनच ती सोडत पाहणे पसंत केले. त्यामुळे विजेत्यांचा जल्लोष यावेळी पाहण्यास मिळाला नाही.

३२ देशातून सोडतीकडे लक्ष-

म्हाडांच्या घरांचीसोडत असल्याने या सोडतीकडे तब्बल ३२ देशांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. सुरुवातील ३२ हजार नागरिक होते, ती संख्या कालांतराने म्हणजे १२ वाजेपर्यंत ८५ हजारांच्या घरात पोहोचली होती.

या जिल्ह्याने नोकरीपाठोपाठ घर दिले-

मूळ धुळे येथील राहिवासी असलेले संतोष गायकवाड हे शहर पोलीस दलात असून सद्यस्थितीत ते कासारवडवली येथे कार्यान्वित आहे. त्यांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे. ठाणे जिल्ह्याने त्यांना जशी नोकरी दिली तसेच घर ही दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आई वडिलांसह कुटुंबाला राहण्यासाठी हक्काचे घर मिळाले आहे. हे घर लागल्याने खूप आनंद होत असून तो शब्दात सांगता येत नाही.

नशीब लागते-

भाड्याने राहणाऱ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी म्हाडाच्या घराची लॉटरी लागल्याने खूप आनंद झाला आहे. पहिल्यांदाच अर्ज करताना यावेळी १० ते १२ मित्रांनीही अर्ज केला होता. तर या लॉटरीसाठी आलेले अर्ज पाहून खरोखरच यासाठी नशीब लागते याची प्रचिती आली. म्हाडाची लॉटरीमध्ये पारदर्शकता असल्याचे रवी शिंदे यांनी सांगितले.

लॉटरीमध्ये पारदर्शकता-

म्हाडाच्या घरासाठी चार वेळा अर्ज केला होता. अखेर आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने खूप आनंद झाला आहे. तसेच म्हाडाच्या लॉटरी पद्धतीत खरोखरच पारदर्शकता आहे. असे घराची लॉटरी लागणाऱ्या अजित किटकर यांनी सांगितले.

यादीत नाव दिसल्याने भोसले धावले स्टेजवर -

लॉटरी सुरू झाल्यानंतर पाच ते सहा राउंड झाले, नेतेमंडळी गेले तरी घराची लॉटरी लागणारे कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे घराची लॉटरी लागलेल्या व यादीत नाव असलेल्या मंडळींनी स्टेजवर यावे, यासाठी वारंवार आवाहन केले जात होते.याचदरम्यान डी.जी.भोसले हे घराची लॉटरी लागली या आनंदाने उठून स्टेज कडे धावले. त्यांना छायाचित्रकारांनी घेरले. फोटो क्लिक सुरू झाले. स्टेजवर गेल्यावर त्यांचे नाव प्रतीक्षा यादी असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना अजून काही दिवस तरी घरासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

पहिली सोडत ठरली शंभर नंबरी-

सोडतीचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला.पहिली सोडत शंभर घरांची काढण्यात आली. तर या सोडतीच्या नाहीतर संपूर्ण सोडतीच्या रचना चांदोरकर या पहिल्याच विजेत्या ठरल्या आहेत. पहिली सोडत कल्याणच्या शिरधोन येथील काढण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते घरांच्या सोडती पार पडल्या.

Web Title: Some happiness, some sorrow in MHADA's Lottery draw in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.