शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

सूर्यमाळ आश्रमशाळा निकृष्ट; सात कोटी आठ लाख खर्च जाणार वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:00 AM

धकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.

मोखाडा : अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा १ कोटी रु पये वाढीव खर्च करून देखील झालेल्या निकृष्ट बांधकामामुळे सूर्यमाळ आश्रमशाळेच्या उभारणीचे हे प्रकरण चर्चेमध्ये आले आहे. दरम्यान, हे बांधकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.कुठे पत्रेच फुटलेत तर, कुठे त्यातून पाणी झिरपतेय यामुळे ओल्या झालेल्या लाद्यांवर कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे, शेजारी तुटक्या फुटक्या पत्र्याच्या पेट्या कोपºयात सरकवकलेल्या पहावयास मिळातात. आगोदरच ओल्या असणाºया लाद्या व भिंती त्यात कपडे सुकविणे अशक्यच यामुळे अनेकांना त्वचारोग झाल्याचे विद्यार्थी सांगतात. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खिडकीतून पाण्याचे शिंतोडे येतात. अशा वातावरणात जेवण, अभ्यास व झोपणे शक्य आहे का असा सवाल विचारला जात आहे.तालुक्यातील सुर्यमाळ आश्रमशाळेच्या इमारतीचे काम या गावात सुरु आहे. मात्र, पाच वर्ष होऊनही ते पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. २०१३ मध्ये नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ने नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले व या इमारतीच्या बांधकामावर ७ कोटी ८ लाख खर्च झाला असताना अर्धेच काम झाल्याचे चित्र आहे. डोंबिवली येथील सरकारमान्य ई स्टकचर प्रा. लिमिटेड या तंत्र निकेतनने या वास्तूचे स्टकचर आॅडीट करून ते निकृष्ट असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असतानाही शाखा अभियंता एस. एस. पाटील यांनी हे काम सुरूच ठेवले आहे.दरम्यान, या प्रकरणी ८ सप्टेंबर २०१७ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दुसºयांदा २०फेब्रुवारी २०१८ रोजी तो पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकाºयाने येथील सोईसुविधा व या कामाबाबत खोटी करणारी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली.येवढे होऊनही या बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाईचा बडगा न उगारता तसेच अशा भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषींवर फौजदारी कारवाई करणे अपेक्षित असताना फक्त कारवाई करु ती होईल अशा बाजार गप्पा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे.कालावधी वाढत असल्याने खर्चही वाढतो आहेजव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ आश्रमशाळांच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, सुर्यमाळ आणि पळसुंडा येथील काम ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्यामुळे रखडले आहे.यातील पळसुंडा आश्रमशाळेचे बांधकाम जवळपास ७ वर्षापासून सुरु असल्याने कालावधी वाढत आहे व त्यामुळे खर्चाचा आकडाही वाढविला जात आहे. यात ठेकेदार व अधिकाºयांचे खिशे गरम होत आहेत.मुलामुलींचे वसतिगृहाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले असून त्यामध्ये बांधकाम निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. ते बांधकाम पाडण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.- आर. एस. पवार, कार्यकारी अभियंताया इमारतीची पहाणी जिल्हाधिकारी यांनर केली असून कार्यकारी अभियंता यांना संबंधितठेकेदार व अधिकाºयांवर फौजदारी कारवाई बाबत आदेश दिले आहेत. कारवाई केली जाईल- अजितकुंभार, प्रकल्प अधिकारी, जव्हार

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर