ठाण्यात सामाजिक संस्थांनी गरजूंना केले फराळाचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 23:53 IST2017-10-24T23:53:44+5:302017-10-24T23:53:59+5:30
सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो.

ठाण्यात सामाजिक संस्थांनी गरजूंना केले फराळाचे वाटप
ठाणे - सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो. पण, ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्य्र आहे, अशा कुटूंबांना इतका फराळही बनविणे अशक्यप्राय असते. अशाच कुटूंबांमध्ये ेठाण्यातील स्नेहा फाऊंडेशन आणि यश फाऊंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त २० ते २४ आॅक्टोबर दरम्यान फराळाचे वाटप करण्यात आले.
तीन हात नाका तसेच कापूरबावडी पुलाजवळ गरीब आणि गरजू मुलांना फराळ वाटपाचा हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला. स्रेहा फाऊंडेशनच्या प्रसाद भांदिगरे, यश फाऊंडेशनचे निलेश महाडीक, संतोष निकम, मिलिंद शिर्के, प्रशांत कुरकुंडे, विवेक भांदिगरे, रुपेश आयरे, साईराज घोरपडे आणि केदार केसरकर आदींनी यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने हा उपक्रम राबविल्याचे संतोष निकम यांनी सांगितले. शहरातील अशा ३० ते ४० मुलांना आवर्जून ही फराळाची पाकिटे या दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी भेट स्वरुपात दिली. त्यावेळी त्यांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटल्याचे पहायला मिळाली.