शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

‘स्मार्ट सिटी’ची आर्थिक गुंतवणूक बारगळणार?, कोरियन कंपनीसोबत केलेला सामंजस्य करार धूळखात पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 2:06 AM

केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर महापालिकेने सरकारकडे एक हजार ४४५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल पाठविला होता.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एप्रिल २०१७ मध्ये कोरियन कंपनीशी सामंजस्य करार केला होता. दोन वर्षे आठ महिने उलटून गेले, तरी त्याचे पुढे काहीही झालेले नाही. हा करार सध्या धूळखात पडला असून, कंपनीकडून केली जाणारी आर्थिक गुंतवणूक बारगळण्याच्या मार्गावर आहे.केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर महापालिकेने सरकारकडे एक हजार ४४५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल पाठविला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पास आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविण्यासाठी महापालिकेने कोरिया सरकारच्या ‘कोरिया लॅण्ड हाउसिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारावर ६ एप्रिल २०१७ ला स्वाक्षरी झाली. त्यावेळी तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर होते.स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कोरियन कंपनीशी करार केला होता. त्याच कराराच्या धर्तीवर महापालिकेने करार केला. केडीएमसीप्रमाणेच पुणे व नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यासाठी कोरियन कंपनीकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, कल्याण-डोंबिवलीत विकासाला वाव असल्याने कंपनीने केडीएमसीशी करार केला.शहरातील खाडीकिनारा सुशोभीकरण, रेल्वे परिसर वाहतूकमुक्त, वाहतुकीचे नियोजन, रस्ते विकास, आयटी कंपन्या, ग्रीन लॅण्डचा विकास करून त्याद्वारे नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावा कराराच्या वेळी करण्यात आला होता. प्रकल्पांचे मास्टर प्लान कंपनीकडून केले जाणार होते. मात्र, चार हजार कोटींच्या अर्थसाहाय्याविषयी केंद्रासोबत कंपनीचे धोरण ठरल्यावर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कंपनीकडून मिळणारी मदत महापालिकेस वितरित केली जाणार होती. हे अर्थसाहाय्य कमी व्याजदराने पुरविले जाईल, असे म्हटले होते.कोरियन कंपनीसोबतचा करार थंडबस्त्यात पडण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रातील भाजप सरकार सत्तेत आणि राज्यात विरोधी बाकावर आहे. तसेच भाजपने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या मन:स्थितीत शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार दिसत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरविचार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याच धर्तीवर अनेक प्रकल्पांचा फेरविचार होऊ शकतो. भाजपच्या काळात कोरियन कंपनीशी झालेला सामंजस्य करार विद्यमान सरकार पुढे नेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. याशिवाय राज्यातील सरकार बदलल्याने महापालिकेतील अधिकारीवर्गाने कच खाल्ली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही कोरियन कंपनीशी झालेल्या कराराची वाच्यता केली जात नाही.कराराविषयी अनभिज्ञता : केडीएमसीने सापाड, वाडेघर येथील २८४ हेक्टर जागेवर विकास परियोजना राबविण्याचा इरादा राज्य सरकारकडे व्यक्त केला होता. या विकास परियोजनेलाही कोरिया कंपनीचे आर्थिक सहकार्य मिळणार होते. विकास परियोजनेची अधिसूचना राज्य सरकारने २४ डिसेंबरला काढली. त्यानंतर २५ जानेवारीपर्यंत हरकती, सूचना घेतल्या गेल्या आहेत.राज्य सरकारच्या अधिसूचनेत कोरियन कंपनीच्या कराराचा काहीच उल्लेख नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाने या कंपनीशी झालेल्या कराराविषयी अनभिज्ञता दाखविली आहे. सरकार बदलल्याने ही सोयीस्कर भूमिका अधिकारी घेत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी व विकास परियोजनेसाठी कोरिया कंपनीकडून मिळणारे आर्थिक पाठबळ बारगळणार आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी