सोशल मिडियावर बदनामीकारक फोटो आणि मजकूर व्हायरल: मकरंद अनासपुरेंची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:07 PM2019-08-02T22:07:35+5:302019-08-02T22:25:23+5:30

आपल्या विनोदी भूमीकेमुळे संपूर्ण महाराष्टÑभर लाखो चाहते असलेल्या मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 Slanderous photos and text on social media went viral: Makrand Anasapure reg complaint in police station | सोशल मिडियावर बदनामीकारक फोटो आणि मजकूर व्हायरल: मकरंद अनासपुरेंची पोलीस ठाण्यात धाव

कासारवडवली पोलीस ठाण्यात केली तक्रार

Next
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात केली तक्रारगेल्या वर्षभरापासून सुरु होता प्रकारफेसबुकवर फोटो मॉर्फ करुन बदनामीकारक मजकूर केला व्हायरल

ठाणे: सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बदनामी करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: अनासपुरे यांनीच याप्रकरणी ही तक्रार दाखल केली असून यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोसिलांनी सांगितले.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील रहिवाशी असलेले सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे मुंबई ठाण्यासह राज्यभर अनेक चाहते आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या छायाचित्रांना मॉर्फ (संपादित करुन) फेसबुकवर वादग्रस्त मजकूर व्हायरल करण्यात आला. या मजकूराशी वास्तवाशी आणि अनासपुरे यांच्याशी कोणताही संबंध नसल्यामुळे तसेच तो विनोदी मजकूर असल्यामुळे अनासपुरे यांनीही त्याला फारसे महत्व दिले नाही. परंतु, मार्च ते जुलै २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राजकीय स्वरु पाचा तसेच समाजामध्ये अनासपुरे यांच्याबद्दल गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करणारा मजकूर फेसबुकद्वारे प्रसारित होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी २ आॅगस्ट रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

‘‘ फेसबुकवर मकरंद अनासपुरे यांचे मॉर्फ केलेले फोटो टाकून त्यामध्ये बदनामीकारक मजकूर टाकल्याची त्यांची तक्रार आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.’’
पंकज शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणे
 

 

Web Title:  Slanderous photos and text on social media went viral: Makrand Anasapure reg complaint in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.