ठाण्यामध्ये नवदर्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:59 IST2018-07-20T08:52:10+5:302018-07-20T08:59:01+5:30

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही

The slab of a house in Navsarshan building collapsed in Thane, 4 others injured | ठाण्यामध्ये नवदर्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी

ठाण्यामध्ये नवदर्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी

ठाणे - ठाणे पश्चिमेकडील नौपाडा येथील नवदर्शन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर स्लॅब कोसळला. मध्यरात्री 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये 4 जण जखमी झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

ठाण्याच्या नौपाडा परिसरातील एम. जी रोडवर नवदर्शन ही तीन मजली इमारत असून ही इमारत 35 वर्ष जूनी आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी मुकेश शेलार यांच्या घराचा स्लॅब कोसळला आहे. यामध्ये मुकेश शेलार (50 वर्ष), नर्मदा शेलार (75 वर्ष), मिलिंद शेलार (40 वर्ष), माधुरी शेलार ( 37 वर्ष) हे चार जण जखमी झाले. या इमारतीत एकूण 12 सदनिका आणि 5 व्यावसायिक गाळे आहेत.

Web Title: The slab of a house in Navsarshan building collapsed in Thane, 4 others injured

टॅग्स :thaneठाणे