डहाणू किनाऱ्यावर आढळली सहा जखमी कासवे
By Admin | Updated: June 28, 2017 01:57 IST2017-06-28T01:57:02+5:302017-06-28T01:57:02+5:30
समुद्रकिनाऱ्यावरील विविध गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून ६ जखमी कासवे आढळली. त्यामध्ये रिडले आॅलिव्ह, ग्रीन सी टर्टलचा समावेश आहे.

डहाणू किनाऱ्यावर आढळली सहा जखमी कासवे
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : समुद्रकिनाऱ्यावरील विविध गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून ६ जखमी कासवे आढळली. त्यामध्ये रिडले आॅलिव्ह, ग्रीन सी टर्टलचा समावेश आहे. या कासवांवर पारनाका येथील वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रांत उपचार सुरू आहेत.
वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणिमित्र संघटनेने डहाणू येथून एक ग्रीन सी टर्टल आणि डहाणू गाव, चिंचणी, नरपड, बोर्डी तसेच पालघर वडराई येथून प्रत्येकी एक रिडले आॅलिव्ह जातीचे जखमी कासव दाखल केल्याची माहिती संस्थापक धवल कन्सारा यांनी दिली.