शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सहा शहरात 9 लूटारुंचा रात्रभर धुमाकूळ,14 जणांना लूटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:22 IST

बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजल्यापासून 9 लूटारुंनी सहा शहरांमध्ये धुमाकूळ घालून जवळपास 14 जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण- बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजल्यापासून 9 लूटारुंनी सहा शहरांमध्ये धुमाकूळ घालून जवळपास 14 जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसानी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन नऊ जणांपैकी चार जणांना पकडले आहे. पकडलेल्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. आत्तार्पयत तीन जण तक्रार देण्यासाठी समोर आले आहेत. तीन विविध पोलिस ठाण्यात लूटणा:यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे नऊ जण चांगल्या घरातील आहेत. त्यांना पॉकेटमनीसाठी पैसे हवे असल्याने त्यांनी हा उद्योग केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पकलेल्यांची नावे अविनाश झा, मंगेश ढोणो, केदार परब अशी असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आरोपी आहे. याच्या सोबत असलेले राज तिवारी, एस.आव्हाड, ओमकार खरात, रोहित सिंग आणि प्राजंल बव्रे हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. हे सगळेजण कल्याण नांदिवली परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. या लूटारुंची टोळी काल रात्री दहा वाजता निघाली. त्यांनी प्रथम टाटा पॉवर येथील मंगेश बागवे नामक चालकास लुटले. त्यानंतर त्यांनी लूटीचा मोर्चा ठाण्याकडे वळविला. त्याठिकाणी खाजगी टॅक्सी चालक गणोश चिकणो याला लूटले. ठाण्याहून ते पुन्हा अंबरनाथला आले. अंबरनाथला एका गाडी चालकाला लूटन त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन त्यांनी मुंब्रा गाठला. त्याठिकाणी एका ट्रक चालकाला लुटले. हा सगळा लुटीचा धुमाकूळ सुरु असल्याने पोलिसांना कोणीतरी फोन केला. पोलिसांकडून लूटीचा मेसेज पोलिस नियंत्रण कक्षाला गेला. पोलिस नियंत्रण कक्षातून नाकाबंदी लागली गेली. यावेळी नाकाबंदी पासून लूटणारी टोळी मागे वळायची. त्याच्या मागे पोलिसांचा पाठलाग सुरु होता. या पाठलागा दरम्यान त्यांनी पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांच्या दोन गाडय़ांना नुकसान पोहचविले. पोलिस पाठलाग करीत असल्याने लूटारू बेफाम झाले. त्यांची गाडी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात दीपक हॉटेलजवळून पास होणार असल्याचा मेसेज पोलिसांनी त्याठीकाणच्या पोलिसांना दिला होता. लूटारूंची टोळीची गाडी भरधाव असल्याने पोलिसांनी अंदाज बाधून दोन रिक्षा चालकांना त्यांच्या वाटेत रिक्षा आडवी उभी करण्याचे सांगितले. लूटारुंच्या भरधाव गाडीने दोन्ही रिक्षा चालकाना उडविले. त्यात एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका रिक्षा चालकाची रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली आहे. पोलिस त्याला त्याच्या रिक्षाची भरपाई देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी ठाणो, डोंबिवली मानपाडा आणि अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसानी चार जणांना पकडले आहे. अन्य पाच जण पसार झालेले आहे. त्यांचाही लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल. तूर्तास पोलिसांसमोर तीन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार तीन तक्रारदार समोर आलेले असले तरी पकडलेल्या चार आरोपींनी रात्रभरात त्यांनी 14 जणांना लुटले असल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. जोर्पयत अन्य 11 तक्रारदार समोर येत नाहीत तोर्पयत अन्य घटनांमध्ये गुन्हा दाखल होणार नाही. अन्य तक्रारदारांनी समोर येऊन तक्रार दाखल करणो आवश्यक आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा