उल्हासनगर गुरसहानी लॉ कॉलेजात रंगले सिंधी कवी संमेलन; शिक्षक व विध्यार्थी सहभागी

By सदानंद नाईक | Published: March 2, 2024 05:54 PM2024-03-02T17:54:23+5:302024-03-02T17:54:35+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३, सीएचएम कॉलेज परिसरातील लॉ कॉलेज मध्ये १ मार्च रोजी पाहिले सिंधी कवी संमेलनाचे आयोजन केले होते.

Sindhi poets meet held at Ulhasnagar Gursahani Law College; Teacher and student participants | उल्हासनगर गुरसहानी लॉ कॉलेजात रंगले सिंधी कवी संमेलन; शिक्षक व विध्यार्थी सहभागी

उल्हासनगर गुरसहानी लॉ कॉलेजात रंगले सिंधी कवी संमेलन; शिक्षक व विध्यार्थी सहभागी

 उल्हासनगर : शहरातील नारी गुरसहानी लॉ कॉलेज मध्ये पाहिले सिंधी कवि समेलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने करण्यात आले होते. कवी संमेलनात शाळा महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, सीएचएम कॉलेज परिसरातील लॉ कॉलेज मध्ये १ मार्च रोजी पाहिले सिंधी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाला महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, अकादमीचे सदस्य राजू जग्यासी, लाल पंजाबी, विनोद तलरेजा, डॉ संध्या कुंदनानी आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाच्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत कॉलेजच्या प्राचार्या डॉ नीलीमा चंदिरामानी व प्रा. संभावी शेकोकर यांच्या हस्तें झाले. सिंधी अकादमीचे महेश सुखरामानी यांनी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी द्वारा सिंधी भाषा, संस्कृति व सभ्यताच्या प्रचार- प्रसारासाठी सिंधी कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर कार्यक्रमाचे विविध आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सुखरामानी यांनी यावेळी दिली.

सिंधी भाषा देशातील विविध भागात मोठ्या संख्येने बोलली जात असून ती टिकविण्यासाठी युवकांनी पुढे यावे. असेही सुखरामानी यांनी म्हटले. नारी गुरसहानी लॉ कॉलेजच्या प्राचार्या व कॉलेजचे विध्यार्थी यांना आश्वासन दिले की, राज्य सिंधी अकादमीद्वारे कॉलेज मध्ये होणाऱ्या सिंधी कार्यक्रमासाठी निधी देण्याचे मान्य केले. यावेळी कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थांनी एका पेक्षा एक कविता बोलून उपस्थितांचे मने जिंकून घेतली. प्राचार्या डॉ चंदिरामानी यांनी सिंधी अकादमीचे कार्याध्यक्ष सुखरामानी यांच्यासह अन्य पाहुण्यांचे कवी संमेलन यशस्वी केल्या प्रकरणी आभार व्यक्त केले.

Web Title: Sindhi poets meet held at Ulhasnagar Gursahani Law College; Teacher and student participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.