शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभदीप’, ‘सद्गुरू’ अन् ‘पलावा’ येथून हलली सूत्रे; एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी केले ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:09 IST

पहाटेपर्यंत या बंगल्यांपाशी मोटारींचा ताफा उभा असतो, नेते, पदाधिकारी यांची वर्दळ असते, याच बंगल्यांतून सुटलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करणारी फळी तैनात आहे. जवळपास ९० टक्के बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात या तीन सत्ताकेंद्रांना यश आल्याचा दावा केला जात आहे.

ठाणे/डोंबिवली : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीतील राजकारणाची व मुख्यत्वे बंडखोरांना थंड करून निवडणुका बिनविरोध करण्याची सूत्रे ठाण्यातील ‘शुभदीप’ या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या, डोंबिवलीतील ‘पलावा’ येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आणि डोंबिवलीतील ‘सद्गुरू’ या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरून मागील दोन-चार दिवस हलत होती. पहाटेपर्यंत या बंगल्यांपाशी मोटारींचा ताफा उभा असतो, नेते, पदाधिकारी यांची वर्दळ असते, याच बंगल्यांतून सुटलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करणारी फळी तैनात आहे. जवळपास ९० टक्के बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात या तीन सत्ताकेंद्रांना यश आल्याचा दावा केला जात आहे.

महायुतीतील उमेदवारांसमोरील बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. या बैठकीनंतर ९० टक्के बंडखोर उमेदवार उमेदवारी मागे घेतील, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. बंडखोरांना विविध पदांची आमिषे दाखवण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीला माजी खा. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, आ. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, तसेच शिंदेसेनेचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीवर चर्चा करत समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. कुठल्या बंडखोराशी कुणी बोलायचे, काय आश्वासन द्यायचे, याचे निर्णय याच बैठकीत झाले. काही बंडखोरांना या बैठकीतून फोन करण्यात आले. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आणणे आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे याबाबत चर्चा झाली. ठाण्यातील शिंदेसेनेच्या काही उमेदवारांना मुंबई पालिका निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी  दिली आहे. त्यांना बिनविरोध निवडून आणण्याची योजना आखली. 

१८ मध्ये मनधरणी करण्यात अपयशप्रभाग क्रमांक १८ मध्ये संपूर्ण पॅनलच शिंदे सेनेला बिनविरोध निवडून आणायचे होते. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. दीपक वेतकर यांच्या समोर असलेल्या उमेदवाराची मनधरणी करण्यात अपयश आले. प्रभाग क्रमांक पाचमध्ये परिषा सरनाईक यांच्यासमोरील महिला उमेदवाराने माघार घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले.भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने त्या अपक्ष लढत आहेत. त्यांना माघार घ्यायला लावण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न झाले परंतु अखेरच्या क्षणी ते अफसल झाले. 

दोन्ही पक्षांच्या टीम कार्यरतभाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गेले काही दिवस दररोज दिवसभर दौैरा करतात आणि रात्री पलावा येथील त्यांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू असतो. जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच नाना सूर्यवंशी आदी नेते, पदाधिकाऱ्यांची टीम येथे असते. चव्हाण यांचे बंडखोरांशी बोलणे झाल्यावर त्यांच्या भेटीगाठी घेणे व समजूत काढणे हे काम ही टीम करते. तिकडे डोंबिवलीतील ‘सद्गुरू’ बंगल्यावर खा. श्रीकांत शिंदे, आ. राजेश मोरे व अभिजीत दरेकर ही मंडळी बंडखोरांशी संवाद साधत होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rebel Wrangling: Shinde, Shinde, Chavan Orchestrate Unopposed Election Strategy

Web Summary : Key leaders orchestrated efforts from Thane and Dombivli to quell rebel candidacies in Maharashtra's municipal elections. Utilizing negotiation and promises, they reportedly convinced around 90% of rebels to withdraw, aiming for unopposed victories for their coalition.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना