श्रीअनगळ अयोध्येतील राम मंदिराचे हिशेब ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 00:16 IST2020-08-11T00:15:02+5:302020-08-11T00:16:16+5:30
नियोजनानुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीअनगळ विमानाने लखनौ येथून अयोध्येत जाणार

श्रीअनगळ अयोध्येतील राम मंदिराचे हिशेब ठेवणार
डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डोंबिवलीतील जुने स्वयंसेवक आणि संघाच्या कोकण प्रांताचे १९९० पासून व्यवस्थाप्रमुख, संघाच्या अखिल भारतीय स्तरावरील आर्थिक कामाचा अनुभव असलेले मदनमोहन मधुसूदन ऊर्फ श्रीअनगळ यांची अयोध्या येथील श्रीराम तीर्थक्षेत्र ट्रस्ट या मंदिर उभारणीच्या कामाकरिता जमा होणाऱ्या निधी (गंगाजळीचे) हिशेब ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ही जबाबदारी त्यांना दिली आहे.
नियोजनानुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीअनगळ हे विमानाने लखनौ येथून अयोध्येत जाणार आहेत. मंदिर उभारणीकरिता किमान साडेतीन वर्षे लागणार असून तोपर्यंत हिशेब ठेवण्याचे काम ते करणार आहेत. अनगळ हे १९९० आणि १९९२ अशा दोन्ही वेळी अयोध्येत कारसेवक म्हणून गेले होते. त्यांचे वडील कै. मधुसूदन अनगळ हे देखील १९९० मध्ये कारसेवेला गेले होते.
शहरातून पिता-पुत्र कारसेवेला गेल्याचे ते एकमेव उदाहरण होते. काही वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत हे डोंबिवलीमध्ये आले होते तेव्हा अनगळ कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नेहरु मैदान येथील त्यांच्या घरी गेले होते.