ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 17, 2023 13:07 IST2023-12-17T13:06:48+5:302023-12-17T13:07:36+5:30
यात्रेत लेझीम पथकासह, ढोल ताशा पथकही सहभागी झाले आहेत.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा* राम गणेश गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर या मार्गावर काढण्यात आली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात सहभागी झाले आहेत.
यात्रेत लेझीम पथकासह, ढोल ताशा पथकही सहभागी झाले आहेत. श्री राम जय राम जय जय रामच्या घोषणा ही यावेळी देण्यात येत आहेत. यात्रेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या मार्गावरील वाहतूकही काही काळ थांबविण्यात आली होती.