शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

'आमदार असा असावा'... मुंबईतील तुंबलेल्या पावसात नागरिकांसाठी झटणारा MLA

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 19:40 IST

या पूरस्थितीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीने हजर राहत एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका केली.

मुंबई - शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, रायगड, ठाणेसह नवी मुंबईकरांचे मेगा हाल झाले. शनिवारी पहाटेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाने आपला मारा कायम ठेवला. शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर कल्याणसह परिसरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली होती. तर, कल्याणच्या पुढेही लोकल वाहतूकही बंद करण्यात आली होती. वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात फसली होती. या पूरस्थितीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीने हजर राहत एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका केली. तर कल्याण पश्चिमचे आमदारही गडघाभर पाण्यात भिजून नागरिकांना मदत करत होते.

कल्याणसह भागात पाणीच पाणी झाल्यानंतर कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पाटील यांनीही चक्क सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे पाण्यातून चालताना दिसले. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी ते पाण्यातून मार्ग काढत होते. मुसळधार पावसामुळे कल्याण आणि परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले होते. गोविंदवाडी, एव्हरेस्ट नगर, शहाड, सांगळेवाडी, योगिधाम आणि परिसरात जाऊन आमदार नरेंद्र पवार यांनी नागरिकांना मदत केली. तसेच, सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचंही काम त्यांनी बजावले. अनेकांना अन्न, पाणी आणि इतर गरजेच्या वस्तूही उपलब्ध करून दिल्या. आमदारसाहेबांनी केलेली मदत आणि दिलेला धीर यामुळे नागरिकांमध्येही आत्मविश्वास वाढला. यावेळी, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करत आहोत. पाण्याची पातळी कमी होत आहे. मात्र, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मला 7026023939 या हेल्पलाईनवर कळवा, असे आवाहनही आमदार नरेद्र पवार यांनी परिसरातील नागरिकांना केलं होतं.  

दरम्यान, 'आलिशान कारमधून न उतरणे आणि अंगावरील उंची कपड्यांची इस्त्रीही न मोडू देणे हे सध्याच्या लोकप्रतिनिधींचे गुणवैशिष्ट्य आहे. मात्र, नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामातून 'आमदार कसा असावा, तर मतदारसंघातील नागरिकांसाठी भरपावसातही भिजलेला दिसावा', हे त्यांनी दाखवून दिले.  

टॅग्स :MLAआमदारRainपाऊसkalyanकल्याणMumbaiमुंबईWaterपाणी