ठाण्याच्या विवियाना मॉलमधील शॉपर्स स्टॉप आणि गिली डायमंड ज्वेलरी दुकानावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 23:49 IST2018-02-15T23:49:23+5:302018-02-15T23:49:30+5:30
सध्या गाजत असलेल्या 11,300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील शॉपर्स स्टॉपमधील गिली या शोरूमच्या काऊंटरवर आणि गिली डायमंड ज्वेलरी शॉपवर गुरुवारी रात्री ईडीच्या पथकाने छापेमारी केली.

ठाण्याच्या विवियाना मॉलमधील शॉपर्स स्टॉप आणि गिली डायमंड ज्वेलरी दुकानावर छापा
ठाणे : सध्या गाजत असलेल्या 11,300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील शॉपर्स स्टॉपमधील गिली या शोरूमच्या काऊंटरवर आणि गिली डायमंड ज्वेलरी शॉपवर गुरुवारी रात्री ईडीच्या पथकाने छापेमारी केली.
गुरुवारी रात्री ईडीच्या 6 जणांच्या पथकाने विवियाना मॉलच्या शॉपर्स स्टॉपमधील डायमंड विक्री करणाऱ्या गिली शॉपचा स्टोल आणि त्याचे मोठे शॉप असलेल्या गिली या डायमंड शॉपवर दुकाने सील करून तपासणी करण्यात आली. या छापमारीत ईडीच्या पथकाने किती माल सील केला, याबाबत ईडीच्या अधिका-यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.