शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातील मेडिकल दुकान कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात दोन महिलांचाही समावेश

By जितेंद्र कालेकर | Updated: January 6, 2020 00:35 IST

ठाण्यातील कळवा येथील औषध विक्रीच्या दुकानात गोळीबार करुन हल्लेखारोने एक आठवडयांपूर्वी पलायन केले होते. या खून प्रकरणात हल्लेखोरासोबत टेहळणीसाठी आणखीही दोन महिला होत्या, अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

ठळक मुद्दे पोलिसांचा संशयगुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच पथकांकडून तपास अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा, शिवाजीनगर येथील एका औषधविक्रीच्या दुकानात चोरीसाठी शिरलेल्या दरोडेखोराने केलेल्या गोळीबारात प्रेमसिंग राजपुरोहित या कर्मचा-याची हत्या झाली होती. या हत्येनंतर पसार झालेल्या दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी हे प्रकरण आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे कळवा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे या खून प्रकरणात एक हल्लेखोरच नव्हे तर आणखीही दोन महिलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.कळवा पूर्व येथील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका दरोडेखोराने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. चोरी करून पळण्याच्या बेतात असतानाच दुकानामध्ये झोपलेल्या प्रेमसिंग या कर्मचाºयाला दरोडेखोराचा पाय लागल्याने त्याला जाग आली. त्याने दुकानात शिरलेल्या या दरोडेखाराला प्रतिकार करताच त्याने रिव्हॉल्व्हरमधून दोन फैरी झाडल्या. यामध्ये छातीत गोळी शिरल्याने प्रेमसिंगचा मृत्यू झाला. दुकानातील अवघी आठ हजार ६५० रुपयांची रोकड लुटण्यासाठी गोळीबार करून दरोडेखोराने पलायन केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनासह चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोपविले आहे. ठाणे शहर युनिट एकसह भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट तसेच कळवा पोलिसांचे एक पथक अशी सहा पथके यातील आरोपीचा शोध घेत आहेत. दरोडा आणि गोळीबाराचा सर्व प्रकार मेडिकलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याआधारे ठाणे, मुंबई, नाशिक, शिर्डी आणि बुलडाणा आदी ठिकाणी आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. मात्र, आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. लवकरच आरोपी पकडला जाईल, असा विश्वास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आरोपी एक नव्हे तीनकळवा येथील गोळीबार प्रकरणात मेडीकलच्या दुकानात एका हल्लेखोराचे छायाचित्र आले आहे. मात्र, त्याच्यासोबत आणखीही दोन महिला असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही शिवाजीनगर परिसरात सुमारे दोन तास घुटमळत होते. त्यामुळे हा हल्ला नेमकी चोरीसाठी झाला की त्यामागे आणखीही काही कारण आहे, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली.

राज्यभरात आरोपीचे फोटो पाठविणारया गुन्ह्याच्या तपासाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ४ जानेवारी रोजी आढावा घेतला. मेडिकल दुकानात मिळालेल्या सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे मुंबई आणि ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हल्लेखोराचे छायाचित्र पाठविण्यात आले आहे. आता हे छायाचित्र राज्यातील इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच नियंत्रण कक्षामध्येही पाठविण्यात येणार आहे. ठाणे, मुंबईतील अभिलेखावरील गुन्हेगार (हिस्ट्री शिटर) यांची यादी तसेच फोटोही पडताळले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून