ठाण्यात गोळीबारात एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:19 AM2019-12-29T02:19:50+5:302019-12-29T02:19:57+5:30

मारेकरी सीसीटीव्हीत कैद; मेडिकल शॉपमधून रोकड लांबवली

One shot dead in Thane | ठाण्यात गोळीबारात एक जण ठार

ठाण्यात गोळीबारात एक जण ठार

Next

ठाणे : चोरी करण्याच्या उद्देशाने मेडिकल दुकानात शिरकाव करीत चोरट्याने केलेल्या गोळीबारामध्ये दुकानातील कर्मचारी प्रेमनाथ किशोरसिंग राजपुरोहित (२६) याच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कळव्यात घडली. चोरट्याने सहा हजार रुपयांची रोकड लांबवली असून हा चोरटा मेडिकल शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

कळवा पूर्व, शिवाजीनगर येथे रामसिंग राजपुरोहित याच्या मालकीचे वीर युवराज मेडिकल नावाचे दुकान आहे. या दुकानात त्यांचा नातेवाईक असलेला मयत प्रेमनाथ राजपुरोहित कामाला होता. शुक्रवारी रात्री प्रेमनाथ दुकानातच कामाला थांबला होतो. दुकान बंद करून तो झोपी गेला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याच्या उद्देशाने एका चोरट्याने दुकानात शिरकाव केला. त्यावेळी चोरट्याचा पाय झोपी गेलेल्या प्रेमनाथ याला लागल्याने प्रेमनाथला जाग आली. त्याने चोरट्याचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून दोन राउंड फायर केले. त्यापैकी एक गोळी प्रेमनाथ याच्या छातीला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. चोरट्याने दुकानातील सहा हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मारेकºयाचा शोध सुरू
सदर प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारेकºयाचा शोध सुरू असुन आरोपीला लवकरच पकडू, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.

Web Title: One shot dead in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.