लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये मोटारसायकलवरुन जाणाऱ्या शेमले नसीर (३२) आणि संदेश जांगडे (३३) या दोघांचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घोडबंदर रोडकडून ठाण्याच्या दिशेने जाणाºया मार्गावरुन हे वाहन भरघाव वेगाने ५ एप्रिल रोजी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्याचवेळी नसीर आणि जांगडे हे दोघे मोटारसायकलीवरुन त्याच मार्गाने जात असतांना त्यांना या भरघाव वाहनाने धडक दिली. त्यांच्या अंगावरुन हे वाहन गेल्यामुळे यात चालक असलेल्या संदेश याच्यासह दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड यांच्या पथकाने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या दोघांचाही मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोघांना पाठीमागून कोणत्या वाहनाने धडक दिली? त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक! वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 23:39 IST
एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये मोटारसायकलवरुन जाणाऱ्या शेमले नसीर (३२) आणि संदेश जांगडे (३३) या दोघांचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
धक्कादायक! वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यु
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा