शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

धक्कादायक! मुंबईतून नगरकडे जाणाऱ्या कोरोना संशयितांची कार ठाण्याच्या सीमेवर पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 00:15 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे घाटकोपर येथील एका महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. तिच्या संपर्कातील तिच्या मुलासह चौघेजण चक्क अहमदनगरकडे एका कारमधून पळून जात असतांनाच त्यांना मुरबाडजवळ ९ एप्रिल रोजी दुपारी चाणाक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देमुंबईच्या डॉक्टरांनी अ‍ॅडमिट होण्याचा दिला होता सल्लाठाणे ग्रामीण पोलिसांची कामगिरीवैद्यकीय तपासणीबरोबरच होणार कायदेशीर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: कोरोनाचे संशयित असलेल्या चौघांना घेऊन जाणारी एक कार ठाणे ग्रामीण पोलिसांनी मुरबाडच्या सीमेवर गुरु वारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पकडली. या कारसह चौघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.या कारमधून प्रवास करणाºया मुलांच्या आईचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरु षांचा समावेश आहे. हे चौघेही कोरोना संशयित असून ते ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’मधील असल्याचेही त्यांना माहित होते. त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रु ग्णालयात दाखल होण्यास मुंबईतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आली. तरीही ते घाटकोपर येथून अहमदनगरकडे पळून जात होते. ते टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खरमाटे यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या कारला ताब्यात घेऊन पुन्हा घाटकोपर पोलिसांकडे त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखिल केली जाणार आहे. घाटकोपर इथेच त्यांची चौकशी करून त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्यांच्या कारला मुरबाड सीमेवर रोखल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापासून रोखल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘‘ अशा प्रकारे कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास तसेच हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आले असल्यास विनाकारण पळून न जाता त्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन स्वत:ची चाचणी करुन घ्यावी. यातूनच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण--

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस