लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट, नेहरूनगर येथील एक गृहिणी किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू रसाळे याने तिच्या घरातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी मंगळवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.वागळे इस्टेट नेहरूनगर रोड क्रमांक १८ येथे दत्तात्रय कांबळे हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याच घरासमोर रसाळे हा बिगारी कामगार राहतो. दत्तात्रय यांची पत्नी सोमवारी सायंकाळी किराणा खरेदीसाठी दुकानात गेली होती. त्याचदरम्यान, राजू याने तिच्या घरात वरील बाजूने जिन्यावरून शिरकाव केला. त्यावेळी दत्तात्रय यांच्या मुलीला संशय आल्यामुळे ती लगोलग खालच्या खोलीत बसलेल्या तिच्या वडिलांना हा प्रकार सांगण्यासाठी आली. तोपर्यंत राजूने रोकड आणि दागिन्यांसह एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करून तिथून पलायन केले. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नेमली असून, सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. पवार हे अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक! शेजाऱ्याने मारला दागिन्यांवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 01:22 IST
वागळे इस्टेट, नेहरूनगर येथील एक गृहिणी किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू रसाळे याने तिच्या घरातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच घडली.
धक्कादायक! शेजाऱ्याने मारला दागिन्यांवर डल्ला
ठळक मुद्देठाण्यातील घटनाएक लाख १८ हजारांचे दागिने, रोकड लंपास