ठाण्यात धक्कादायक बाब; एका महिलेला दिले कोरोना लसीचे तीन डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:02+5:302021-06-29T04:27:02+5:30

ठाणे : एकीकडे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सावरकरनगर येथील वयोवृद्ध व्यक्तीला लस न घेता लस घेतल्याचे ...

Shocking matter in Thane; One woman was given three doses of corona vaccine | ठाण्यात धक्कादायक बाब; एका महिलेला दिले कोरोना लसीचे तीन डोस

ठाण्यात धक्कादायक बाब; एका महिलेला दिले कोरोना लसीचे तीन डोस

ठाणे : एकीकडे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सावरकरनगर येथील वयोवृद्ध व्यक्तीला लस न घेता लस घेतल्याचे सायंकाळी प्रमाणपत्र मोबाइलवर प्राप्त झाल्याची धक्कादायक बाब ताजी असताना आता ठाण्यातील ब्रह्माण्ड येथील रूपाली साळी या महिलेला कोरोना लसीचा तिसरा डोस दिल्याची बाब पुढे आली. या संदर्भात भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिकेने त्या महिलेची उपचाराची जबाबदारी घ्यावी, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे, तर प्रशासनाने त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नाही. पण त्या महिलेला तीन वेळा टोचल्याने रिॲक्शन आल्याचे म्हटले आहे. पण त्यांची प्रकृती व्यवस्थित असून महापालिकेचे डॉक्टर त्या महिलेसह तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी डुंबरे यांनी त्या महिलेची आरोग्य तपासणी करून उपचाराचा खर्च करावा, त्याचबरोबर भविष्यातील आजारावर उपचार करण्याबाबत जबाबदारी स्वीकारावी. तसेच संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

‘त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नाही. तीन वेळा टोचले गेल्याने तिला रिॲक्शन झाली आहे. तिच्या कुटुंबीयांशी महापालिकेचे डॉक्टर संपर्कात आहेत. आता साळी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून असल्याने चिंतेचे कारण नाही.

- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

Web Title: Shocking matter in Thane; One woman was given three doses of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.