शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:34 IST

ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ठाणे - राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळाला. मतदानापूर्वीच महायुतीचे ६० हून अधिक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यावरून विरोधकांनी मोठा आरोप केला. विरोधी उमेदवारांवर दबाव आणून, त्यांना धमकावत, पैशांचे आमिष दाखवून निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले जात होते. त्यात निवडणूक अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणाही सहभागी होती असा दावा मनसेने केला आहे. त्यात ठाण्यातील आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात अपक्ष उमेदवारालाच माहिती नसताना त्याचा अर्ज माघारी घेण्यात आल्याचे समोर आले.

ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विक्रम चव्हाण म्हणाले की, ज्यादिवशी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचे होते त्याच्या आदल्या रात्रीपासून मला कॉल येत होते. तुमचा अर्ज माघारी घ्या, काही उपयोग नाही असं सांगण्यात येत होते. मी दुसऱ्या दिवशी माझा फोन बंद करून ठेवला होता.  ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असते. त्यात मी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे आता निवडणूक लढायची आहे हे मी ठरवले. मात्र साडे चार-पाच वाजता २ जणांनी माझ्या सूचकांना घरातून घेऊन जाऊन त्यांच्या अर्जावर सही घेत मी उपलब्ध नाही, माझ्या घरात काहीतरी दुर्घटना घडली आहे त्यामुळे बाहेर गेलोय असं सांगत अर्ज मागे घेतला असं त्यांनी सांगितले.

तसेच ७.३० च्या सुमारास यादी बाहेर लागल्यानंतर हा प्रकार मला कळला. मी तिथे गेलो आणि तिथे प्रवेशही करायला देत नव्हते. पण कसेबसे मी आत गेलो. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना चूक लक्षात आली. त्यानंतर ते माझ्याकडे अर्ज मागत होते. पण इतक्या सहजपणे तुम्ही एखाद्याला बिनविरोध कसे काय करू शकता, मग तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज लिहून द्यायला सांगितला. त्यानंतर मी संपूर्ण घटनाक्रमाने अर्ज लिहून दिला. मग अर्ज माघारी घेण्याच्या यादीतून माझे नाव काढण्यात आले असा आरोप अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी केला.

दरम्यान, ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी एकूण १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता तब्बल ८६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती तसेच आघाडीतील नेत्यांनी बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत सुमारे ९० टक्के बंडखोरी आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे, अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम असून त्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Independent Candidate's Nomination Withdrawn Without Knowledge: Shocking Incident in Thane

Web Summary : In Thane, an independent candidate, Vikram Chavan, alleges his nomination was withdrawn without his consent. He suspects foul play, claiming his proposers were misled into signing the withdrawal form while he was unreachable. An investigation is underway after the candidate protested.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग