धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्यानंतर पती झाला पोलीस ठाण्यात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:52 AM2020-11-21T00:52:50+5:302020-11-21T00:56:15+5:30

चारित्र्याच्या संशयातून लक्ष्मी कटवा (२०) या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून करुन तिला पेटवून दिल्यानंतर पती आकाश मेघजी कटवा (२४) याने स्वत:च पोलीस नियंत्रण कक्षात खूनाची माहिती दिली. त्यानंतर तो स्वत: कळवा पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली.

Shocking! The husband surrender at the police station after killing his wife out of suspicion of character | धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्यानंतर पती झाला पोलीस ठाण्यात हजर

हत्या केल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातही दिली माहिती

Next
ठळक मुद्दे हत्या केल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातही दिली माहितीखूनानंतर मृतदेह दिला पेटवून

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चारित्र्याच्या संशयातून लक्ष्मी कटवा (२०) या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून करुन तिला पेटवून देणाऱ्या आकाश मेघजी कटवा (२४) या पतीला कळवा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. हत्येनंतर स्वत:च पोलीस नियंत्रण कक्षामध्ये माहिती देऊन तो कळवा पोलीस ठाण्यात हजर झाला.
आकाश आणि लक्ष्मी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांमध्येही किरकोळ कारणावरुन वारंवार वाद होत होते. दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिच्या चारित्र्यावरील संशयातून १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या गळयावर सुरीने वार करुन अत्यंत निर्घृणपणे तिचा खून केला. कहर म्हणजे खूनानंतरही त्याने तिच्या अंगावर टर्पेटाईन टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वत: ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात पत्नीच्या खूनाची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर तो स्वत: कळवा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने पत्नीच्या खूनाची कबूली दिली. सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे यांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक सुराही जप्त केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोंटे हे करीत आहेत. त्याला २५ डिसेबंरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Shocking! The husband surrender at the police station after killing his wife out of suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.