शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 10:07 IST

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या दाेघांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे / उल्हासनगर : निवडणूक काळात रोख रक्कम व दारू जप्तीसाठी सुरू केलेल्या चेकपोस्टवर पकडल्या जाणाऱ्या रोकडीची अफरातफर केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे जप्त केलेल्या रकमेची अफरातफर केल्याबद्दल भरारी पथकांच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले.

म्हारळगाव नाका चाैक येथे उल्हासनगरमध्ये भरारी पथक क्र. ३ चे प्रमुख संकेत चानपूर  व भरारी पथक क्र.६ चे प्रमुख संदीप शिरस्वाल यांच्या संयुक्त कारवाईत फुले विक्रीचे ७ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यामधील ८५ हजारांची अफरातफर केल्याबद्दल दाेघांना उल्हासनगर महापालिकेने निलंबित केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या दाेघांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केले.

झेंडू व शेवंतीच्या फुलांची विक्री करून ७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी फूल व्यापारी भांडुपचे बबन आमले व त्यांचा मित्र नितीन शिंदे मुंबईहून कल्याण मार्गे मुरबाडच्या दिशेने जात हाेते. त्यांच्या गाडीची तपासणी  भरारी पथकप्रमुखांनी केली असता त्यात ही रक्कम आढळून आली. फूल खरेदी, विक्रीच्या मालाच्या पावत्या त्यांनी संदीप शिरस्वाल यांना दाखविल्या; परंतु त्यास न जुमानता त्यांनी ही रक्कम जप्त केली. दुसऱ्या दिवशी जप्तीच्या रकमेतून ८५ हजार रुपये काढून घेऊन उर्वरित रक्कम परत केली. आमले यांनी तक्रार दाखल केली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Crime Newsगुन्हेगारी