लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कपडे विक्री करण्यासाठी राखून ठेवलेली जागा बळकविण्यासाठी विपूल याने सोनी वाघेला (२५, रा. कोपरी, ठाणे) या महिलेच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात विपूल याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनी वाघेला आणि तिची जाऊ शोभा या दोघींनी कपडा विक्रीसाठी कोपरीतील सिद्धार्थनगर येथील बबनराव शिंदे सभागृहात २२ मार्च रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास जागा राखून ठेवली होती. त्याचवेळी संगी, विनोद चेखालिया, विपूल आणि नरेश या चौघांनी तिथे येऊन याच जागेवरुन सोनी हिच्याबरोबर वाद घातला. याच रागातून तिचे कपडयाचे गाठोडे फेकून देऊन सोनी, शोभा, तिची सासू तसेच दीर दीपक यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. दीपक याला मारण्यासाठी चहाच्या टपरीजवळ असलेली वीट घेतली. त्यावेळी यात मध्यस्थी करण्यासाठी सोनीने धाव घेतली. तेंव्हा ती वीट सोनी हिच्या डोक्यात मारुन तिला जखमी केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! कपडे विक्रीसाठी जागा बळकविण्याच्या वादातून महिलेवर विटेने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:30 IST
कपडे विक्री करण्यासाठी राखून ठेवलेली जागा बळकविण्यासाठी विपूल याने सोनी वाघेला (२५, रा. कोपरी, ठाणे) या महिलेच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात विपूल याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! कपडे विक्रीसाठी जागा बळकविण्याच्या वादातून महिलेवर विटेने हल्ला
ठळक मुद्देकोपरीतील घटना