शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्येसाठी ऑनलाईन मागवलं विषारी औषध

By पंकज पाटील | Updated: September 28, 2022 18:23 IST

विशेष म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीला ऑनलाईन उपलब्ध झाले. हेच विषारी औषध घेऊन संबंधित पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

बदलापूर : बदलापुरात राहणाऱ्या एका तरुणीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीने बलात्काराच्या घटनेनंतर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीने गुगलवर सर्च करून ऑनलाईन पद्धतीने मागविले होते. ऑनलाइन विषारी औषध उपलब्ध झाल्याने पोलीसदेखील चक्रावले आहेत.

शिवसेनेच्या माजी नगरसेविकाचा मुलगा महेंद्र भोईर याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बदलापूरच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तयेच या घटनेनंतर, संबंधित आरोपी हा तरुणीला लग्नासंदर्भात कोणताही प्रतिसाद देत नव्हता. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी संबंधित तरुणीने गुगलवर विषारी औषध सर्च करून ते ऑनलाईन पद्धतीने मागविले होते. 

विशेष म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीला ऑनलाईन उपलब्ध देखील झाले. हेच विषारी औषध घेऊन संबंधित पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर योग्य वेळी उपचार झाल्याने तिचा जीव वाचला असला तरी हे विषारी औषध ऑनलाईन कसे उपलब्ध झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

ऑनलाइन खरेदीच्या व्यवहार वाढत असताना आता विषारी औषधदेखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्याने पोलीसदेखील चक्रावले आहेत. दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीने विषारी औषधांची विक्री होऊ नये या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी महेंद्र भोईर याला अद्यापही अटक करण्यात आलेले नाही. तर हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याची बाब समोर येत आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती पोलीस प्रशासन देत नाही.  

टॅग्स :MolestationविनयभंगbadlapurबदलापूरPoliceपोलिसonlineऑनलाइन