शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

उल्हासनगरमधील पुनरावृत्तीचा धसका; भाजपात खदखद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:59 IST

नगरसेवकांची जाणून घेतली मते

भाईंदर :   उल्हासनगर महापालिकेत महापौरपदापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपद गमवाव्या लागलेल्या भाजपला मीरा भाईंदरमधील असंतोष पाहता उल्हासनगरच्या पुनरावृत्तीची धास्ती वाटू लागली आहे. त्यातूनच प्रभारी असलेले आमदार मिहीर कोटेचा यांनी ५५ नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.

अनेक ज्येष्ठ व दिग्गज नगरसेवकांसह स्वतः जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. ‘मेहता हटाव व भाजप आणि शहर बचाव’ अशी भूमिका पुढे आली आहे. उल्हासनगरची जबाबदारी सांभाळणारे आमदार रवींद्र चव्हाण हेच मीरा-भाईंदरमध्येही प्रभारी म्हणून लक्ष देतात. स्थायी समिती सदस्य नियुक्ती आणि सभापती पदासाठी मेहता व मेहता विरोधी गटात संघर्ष सुरू झाला आहे. कोटेचा यांनी प्रभारी पदाची सूत्रे स्वीकारून नुकतीच नगरसेवकांची भेट घेतली होती. 

मंगळवारी त्यांनी मीरा रोडच्या जीसीसी क्लबमध्ये प्रत्येक नगरसेवकाशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. या वेळी माजी आमदार नरेंद्र मेहता, आमदार रवींद्र चव्हाण दिसले नाहीत. उल्हासनगरचा अनुभव पाहता चव्हाणांनाही लांब ठेवण्यात आल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. मेहता समर्थक काही नगरसेवकांनी मेहतांमुळेच भाजपची पालिकेत सत्ता आली. आम्ही त्यांच्यामुळे निवडून आलो.  मेहतांनी शहरात खूप कामे केली, अशी भूमिका मांडली. काही नगरसेवकांनी भाजपमधील दोन गटांतील अंतर्गत वाद लवकर मिटवावा जेणेकरून २०२२च्या पालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा स्वबळावर सत्ता आणता येईल, असा सूर आळवला.

... तर पालिका निवडणूक जिंकणे अशक्यअनेक नगरसेवकांनी मात्र मोदींची लाट, चार नगरसेवक प्रभाग पद्धत आणि इतर पक्षांतून मोठ्या संख्येने आलेल्या नगरसेवक - कार्यकर्त्यांमुळे २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले, असे सांगतानाच मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे विधानससभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेवर २०२२ ची पालिका निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचेही सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा