शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:40 IST

मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे.

मीरा रोड - मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत दहीहंडीपासून टप्प्पाटप्प्याने पाच जनआंदोलने करण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.दहिसरची मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये आणण्यासह ती मेट्रो ठाण्याला जोडावी, अशी सतत मागणी शिवसेनेने सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने करतानाच अधिवेशनात विविध मार्गांनी हा मुद्दा मांडला. मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून तसेच स्थानकांचे नामकरण करूनही काम सुरू होत नसल्याने आपण एमएमआरडीएचे अतिरिक्तआयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली आहे. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामासाठी आर्थिक तरतूद करावी व निविदा काढून येत्या डिसेंबरपर्यंत काम सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे. मीरा- भार्इंदर मेट्रोचा सुमारे चार हजार ४०० कोटींचा प्रकल्प आराखडा तयार आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी ७० हजार कोटींचे कर्ज मंजूर असल्याने आर्थिक तरतूद नसली, तरी काम सुरू करायला अडचण नसल्याचे सरनाईक म्हणाले.दहिसर पूर्व ते मीरा-भार्इंदरपर्यंतचे मेट्रोचे काम सुरू न करून सरकारने फसवणूक केली असल्याने शिवसेना आंदोलन करणार आहे.लाँग मार्च काढण्याचा इशारादहीहंडीनिमित्त शिवसैनिक हे आम्हाला मेट्रो हवी, अशी मागणी करणारे टी-शर्ट घालून दहीहंडी फोडण्यासाठी थर रचतील. गणेशोत्सवात मेट्रोच्या मागणीसाठी शिवसेना सार्वजनिक महाआरत्या करणार आहे. नवरात्रीत शहरातील प्रमुख चौकांमध्ये महिला शिवसैनिक या मेट्रोचे काम सुरू करा, म्हणून गरबा खेळणार आहेत. तर, दिवाळीमध्ये सेनेच्या शाखा, सार्वजनिक नाके, इमारती येथे मेट्रोचे काळे कंदील लावले जातील. त्यानंतरही मेट्रोचे काम सुरू केले नाही, तर शहरात जनआंदोलन उभे करून एमएमआरडीएच्या कार्यालयावर लाँग मार्च काढला जाणार असल्याचे आ. सरनाईक यांनी म्हटले.

टॅग्स :Metroमेट्रोnewsबातम्या