शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

गणेशोत्सव देखील 100 टक्के पर्यावरण पूरक साजरा करण्याची आवश्यकता- प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 6:03 PM

कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे.

मीरारोड: शास्त्रात व शासनाने देखील पाण्यात विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केलेले असूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवून रासायनिक रंग वापरले जात असल्याने यंदा पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे . त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे . 

कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे. परंतु एरवी आपली जिवन शैलीमुळे व विविध पद्धतीने होणाऱ्या प्रदूषणामुळे दुरावत चालला निसर्ग व त्यातील प्राणी, पक्षी पुन्हा एकदा उभारी घेतलेले पाहायला मिळतायत. हवेतील व पाण्यातील प्रदूषण कोरोनामुळे थांबले असून पृथ्वी व मानवजातीसाठी या नक्कीच सकारात्मक बाजू आहेत.

कोकणात अगोदरपासून शाडू च्या मातीच्या सुंदर सुबक मुरत्या घडवल्या जातात, पुण्यातही बहुतांश तीच परंपरा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक किंवा इतर परिसरात आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवण्यावर भर देत असल्याने पीओपी आणि रासायनिक रंगा मुळे तलाव , नदी , खाडी व समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन निसर्गाची मोठी हानी होत आहे . 

निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांवर आहे . आता सरकारच्या माध्यमातून प्रदूषण विरहित गणेशोत्सव आदी सण साजरे करायची आवश्यकता आहे .  या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पीओपी वापर बंद करून शाडू मातीच्या मुर्त्याच बनवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी पर्यावरण मंत्री यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे .  कागदाच्या लगद्यापासून मोठ्या मुर्त्या आणि शाडूच्या मातीपासून छोट्या मुर्त्या बनवण्याचा निर्णय घेणे जरुरीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे . 

ज्या मूर्तिकारांनी अगोदरच पीओपी पासून मुर्त्या बनवल्या आहेत त्या राज्य सरकारने स्वतःकडे घेऊन त्याचा जो मोबदला आहे तो मूर्तिकारांना द्यावा, जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही. शाडू मातीच्या मुर्त्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याचे आदेश पूर्वीच शासनाने न्यायालयाच्या आदेश नंतर जरी केले होते . पण त्याची काटेकोर अमलबजावणी केली गेली नाही अशी आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे .

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवMira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईकAditya Thackreyआदित्य ठाकरे