भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST2021-04-02T04:42:08+5:302021-04-02T04:42:08+5:30
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त ठिकठिकाणी महाराजांच्या शिवचरित्रावर आधारित देखावे विविध ...

भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त ठिकठिकाणी महाराजांच्या शिवचरित्रावर आधारित देखावे विविध सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने उभारण्यात आले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर प्रतिभा पाटील, दक्षता तरे, जयेश तरे, माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोंबडपाडा येथे शिवसेना शाखेच्या वतीने देखावा उभारण्यात आला होता. यावेळी महाराजांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते मयूरेश पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख मनोज गगे, विभागप्रमुख किसन काठवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर मनोज काटेकर, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, मदन भोई, वसीम खान, वैशाली मेस्त्री, सुगंधा टावरे, कोमल पाटील, लतीफ शेख आदी उपस्थित होते. शहरातील टिळक चौक, कासारआळी, नवी चाळ, कापआळी, शिवाजीनगर अशा विविध ठिकाणी शिवचरित्रावर आधारित देखावे उभारण्यात आले होते.