महागाईविरोधात ठाण्यात शिवसेनेचा विराट मोर्चा, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:22 IST2017-09-25T14:01:53+5:302017-09-25T14:22:07+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने महागाई विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा शाखेचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला.

Shiv Sena's Virat Morcha in Thane against inflation, traffic congestion in city | महागाईविरोधात ठाण्यात शिवसेनेचा विराट मोर्चा, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

महागाईविरोधात ठाण्यात शिवसेनेचा विराट मोर्चा, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

ठळक मुद्देएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक शिस्तबद्ध मोर्चात सहभागी झाले होते. 

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने महागाई विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा शाखेचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक शिस्तबद्ध मोर्चात सहभागी झाले होते. 

खासदार राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. सुभाष भोईर, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवली महापौर राजेंद्र देवळेकर आदी नेते सहभागी झाले होते. 

महागाई विरोधातील मोर्चासाठी शासकीय विश्रामग्रुह व स्टेशनकडील तलावपाळी या दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

Web Title: Shiv Sena's Virat Morcha in Thane against inflation, traffic congestion in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.