शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

इच्छुकांमुळे परिवहन निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:37 PM

४ मार्च रोजी निवडणूक : १२ सदस्य निवडले जाणार; महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाढली अपेक्षा

ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली परिवहन समितीची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी सोमवारी शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून ४, भाजप २ आणि काँग्रेसच्या एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. वास्तविक १२ सदस्य हे परिवहन समितीत निवडून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एकाला सदस्याला शिवसेनेला निवडणूक द्यावे लागणार आहे. त्यातच स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेससोबत असल्याने शिवसेनेला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागणार असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.दोन वर्षांपूर्वी परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ सुंपष्टात आला होता. त्यानंतर पक्षीय बलानुसार परिवहन समिती हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेनेने परिवहनची निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता दोन वर्षांनंतर शिल्लक राहिलेल्या ६ सदस्यांचा कार्यकाळही येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक घेण्यात येत आहे.पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य परिवहनमध्ये जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिवसेनेकडून प्रथमच पक्षाने सर्वात जुन्या आणि निष्ठावान असलेल्या विलास जोशी यांना संधी दिली आहे. यापूर्वी महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत एबी फॉर्म, उमेदवारी अर्ज देण्याचे काम त्यांच्या खांद्यावर असे. याशिवाय अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पुजा वाघ, रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे, बालाजी काकडे आणि राजेंद्र महाडिक यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर राष्टÑवादीकडून तीन सदस्य जाणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून राम भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे.राज्यात महाविकास आघाडी असल्याने परिवहनमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसची आहे. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील अधिकचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. स्थायीची परतफेड करण्यासाठी काँग्रेसला साथ देणे शिवसेनेला क्रमप्राप्त झाले आहे. दुसरीकडे राष्टÑवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला रोखण्यासाठी शिवसेना परिवहनमध्ये प्रयत्न करणार आहे. त्यानुसार भाजपने दोन अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे मत आपल्या उमेदवाराबरोबर राष्टÑवादीच्या उमेदवाराला मिळाले तर भाजपचा एकच सदस्य परिवहनमध्ये जाण्याची शक्यता आहे. ही सर्व समीकरणे जुळून येत असली तरी महाविकास आघाडीमुळे शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना