शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

शिवसेनेचा डोलारा पालिका प्रशासनावर

By admin | Updated: January 31, 2017 03:18 IST

ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या काही कामांचा, काही पूर्णत्वास गेलेल्या कामांचा आणि काही नव्याने हाती घेण्यात आलेल्या कामांचा समावेश असलेला शिवसेनेचा

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या काही कामांचा, काही पूर्णत्वास गेलेल्या कामांचा आणि काही नव्याने हाती घेण्यात आलेल्या कामांचा समावेश असलेला शिवसेनेचा वचननामा सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ, पारसिक चौपाटी, धरण, ३० एकरांवर सेंट्रल पार्क आदी आश्वासनांसह महापालिकेनेच केलेल्या कामांचा अंतर्भाव या वचननाम्यात दिसून आला आहे. अर्थात, दिव्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही दिसून आले.शिवसेनेच्या वतीने ‘२५ वर्षे विश्वासाची, २५ वर्षे विकासाची’ अशा आशयाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईत हा वचननामा प्रसिद्ध झाल्यावर विरोधकांकडून त्यावर सडकून टीका झाली होती. प्रशासनाच्या कामांचाच आधार घेऊन हा वचननामा तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याचा समाचार घेताना शिंदे यांनी ठाणे महापालिकेत आम्ही सत्ताधारी असल्याने प्रशासनाच्या मदतीने आम्ही ही कामे करीत असल्याचे ठासून सांगितले. ज्या महापालिकेत ज्यांची सत्ता असते, तेच त्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना ठरवत असतात. आम्ही कोणाचेही श्रेय घेत नसून सर्वांना बरोबर घेऊनच विकास करतो, असे प्रत्युत्तरही त्यांनी आपला मित्रपक्ष भाजपाला या वेळी दिले. (प्रतिनिधी) शिवसेनेने ज्याज्या योजनांचा उल्लेख आपल्या वचननाम्यात केला आहे, त्यातील तब्बल ८० टक्क्यांहून अधिक कामे यापूर्वीच सुरू झाली असून काही कामांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे, काही कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. वचननाम्यातील ठळक वैशिष्ट्येस्मार्ट सोल्युशनसंपूर्ण शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सर्व्हिलन्स सिस्टिम, यामध्ये सीसीटीव्हीचे जाळे, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम, क्विक रिस्पॉन्स टीम, मध्यवर्ती ठिकाणी इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर उभारून त्यात महापालिका, अग्निशमन, पोलीस रुग्णालये, नॅशनल डिझॉस्टर रिस्पॉन्स फोर्स यांचा समन्वय साधून तातडीने मदत, वाहतूककोंडी दूर करण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक अ‍ॅण्ड सिग्नल मॅनेजमेंट यंत्रणा, स्मार्ट स्ट्रीप्स वापरून अ‍ॅपद्वारे ठाणेकरांना पार्किंगबाबत रिअल टाइम मार्गदर्शन. उद्याने आणि चौपाटी कोलशेत येथे ३० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क, बाळासाहेब ठाकरे उद्यान, रायलादेवी तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित, पातलीपाडा येथे नवे ठाणे, जुने ठाणे आशयाचे थीम पार्क, २६ किमी लांबीच्या किनारपट्टीलगत निसर्गाचे व पर्यावरणाचे संवर्धन करत आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी, खाडीकिनारी हॉट एअर बलून, लंडन आयच्या धर्तीवर मनोरा, कळवा-खारेगाव, मुंब्रा येथील रहिवाशांना सिंगापूरच्या मरिना बे च्या धर्तीवर रेतीबंदर येथे चौपाटी, वाघबीळ येथे ट्रॅफिक गार्डन.नागरी सुविधाशहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांचे एकत्रीकरण करून प्रशासकीय भवन बांधण्यासाठी प्रयत्न, नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शनखाली जॉगिंग ट्रॅक, उद्यान, ओपन जिम सुरू असलेल्या कामांना गती देणे, महत्त्वाच्या ठिकाणी वाहनतळ, प्रभाग समितीनिहाय स्वातंत्र्यवीर योगसाधना भवन, कळवा येथे मिनी थिएटर, चांगल्या दर्जाचे व मोकळे फुटपाथ, घोडबंदर येथे अद्ययावत सर्व धर्मीयांसाठी सामुदायिक स्मशानभूमी व दफनभूमी. विशेष प्रकल्पमेंटल हॉस्पिटलच्या अतिरिक्त जागेवर विस्तारित ठाणे स्थानक, वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रोच्या जाळ्याची व्याप्ती वाढवून घोडबंदर ते बोरिवली, माजिवडा, खारेगाव, शीळ, दिघा, विटावा, कळवा, खारेगाव, ठाणे, कल्याण, भिवंडी या मार्गावर मेट्रोचे जाळे, जलवाहतूक, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, सायन्स सेंटर, वॅक्स म्युझियम, देशविदेशांतील लॅण्ड मार्क्सचं मिनिएचर गार्डन, थ्रीडी फोटो गार्डन, घोडबंदर किल्ल्यास शिवसृष्टी.रस्ते व उड्डाणपूलठाणे पूर्व सॅटीस, तीनहातनाका नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडीचा ताण कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन, तीनहातनाक्यावर आणखी एक उड्डाणपूल, सिडको ते गायमुख कोस्टल बायपास, ठाणे बोरिवली टनेल, श्रीनगर ते गायमुख बायपास, ठाणे-बेलापूरला जोडणारा गायमुख ते साकेत सिडको बायपास, मॉडेल रस्त्याची संख्या २५ वर नेणार, कोपरी ब्रिजचे चौपदरीकरण जलदगतीने पूर्ण करणार.अग्निशमनअग्निशमन दलात मनुष्यबळ वाढवणार, अत्याधुनिक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना, ९० मीटर शिडी असलेल्या अद्ययावत गाडीचा अग्निशमन दलात समावेश, ओवळा-माजिवडा येथील प्रगतीपथावरील अग्निशमन केंद्राची कामे तत्काळ पूर्ण करणार. आरोग्यकॅन्सर रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करणार, नेत्रालय, कॅन्सर तपासणी केंद्र तसेच रेडिएशन सेंटर, बाळासाहेब ठाकरे आरोग्यकवच योजना, डायबेटीस क्युअर सेंटर, १० ठिकाणी केंद्रे, महिलांमधील क्षयरोगाचे निदान करण्यासाठी विशेष दक्षता कक्ष, माफत दरात औषधांसाठी जेनेरिक औषधांची दुकाने, मॉडेल मिल सुविधा भूखंडांवर ईएनटी रुग्णालययुवक कल्याणकौशल्य विकास योजनेला चालना देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, युवकांसाठी धर्मवीर आनंद दिघे रोजगार मार्गदर्शन केंद्र, शिव इनक्युबेशन हब, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रमहिला व बालकल्याणसावित्रीबाई फुले विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अ‍ॅप, स्थानक व उद्यान परिसरात पाळणाघरे, महिलांच्या विविध समस्यांसाठी विशेष हेल्पलाइन, गृहउद्योगांना प्रोत्साहन, ५ मोबाइल कॅन्सर तपासणी पथकेघनकचराकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट, स्थानिक पातळीवर छोट्या आकाराचे प्रकल्प, स्मार्ट बिन्स,शिक्षण पालिकेतील विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य टिळक शिष्यवृत्ती योजना, डायघर येथील २५० एकर जागेवर एज्युकेशन हब, जागतिक कीर्तीच्या शिक्षण संस्थांना पाचारण करून शिक्षणाच्या विविध संधी, ई-लर्निंगची सुविधा, व्हर्च्युअल क्लास रूम, अंध मुलांसाठी नॅबच्या धर्तीवर शिक्षण व रोजगार प्रशिक्षण केंद्र, प्रभागनिहाय ई-लायब्ररी, गणवेशातील शालेय विद्यार्थ्यांना टीएमटीच्या मोफत प्रवासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सवलत योजना. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य या उपक्रमाला चालना, अत्रे कट्ट्याच्या धर्तीवर विशेष विरंगुळा केंद्र, विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र, महापालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष, वार्षिक स्नेह संमेलन, मेंटल हॉस्पिटलजवळ बटरफ्लाय गार्डन, फुलांची थीम गार्डन, तलावांचे शुद्धीकरण व सुशोभीकरण, पातलीपाडा येथे २० हेक्टर जागेवर निसर्ग उद्यान, क्रीडामध्ये घोडबंदर भागात कासारवडवली येथे स्टेडिअम, आर्चरी प्रशिक्षण केंद्र, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अण्णा भाऊ साठे लोककला महोत्सव, मॉडेल मिल येथे आॅडिटोरिअम, डायघर येथील खाडीकिनाऱ्यावरील २० एकर जागेत क्रीडासंकुल, कासारवडवली येथे कलाभवन.गृहनिर्माणअ‍ॅफोड्रेबल हाउसिंग योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे, डीम्ड कन्व्हेअन्ससाठी विशेष मार्गदर्शन व सुविधा कक्ष, धोकादायक इमारतींकरिता १९७४ सालची असलेली मर्यादा दूर करून ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या धोकादायक इमारतींना वाढीव एफएसआय देऊन पुनर्विकासाची संधी, ३० वर्षे जुन्या इमारतींना १० टक्के इन्सेंटिव्ह एफएसआय देऊन पुनर्विकास, क्लस्टर योजनेवर उच्च न्यायालयाची मान्यता मिळताच या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना, एसआरए योजनेची अंमलबजावणीसार्वजनिक वाहतूक टीएमटी सक्षम करण्यावर भर, बाहेरगावी जाणाऱ्या बसगाड्यांसाठी विशेष वाहनतळ, स्मार्ट बससेवा, स्मार्टकार्डच्या माध्यमातून बसच्या तिकिटासह पाणीबिल महापालिकेची इतर देयके भरण्याची सुविधा, बसस्टॉप स्मार्ट करणार, स्टेशन परिसरातील वाहनतळाचे काम पूर्ण करणार, रोरोसेवेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न पाण्याचे नियोजनपुढील ५० वर्षांचे नियोजन करण्यासाठी हक्काचे धरण, पाणीगळती रोखणार, मलनि:सारण केंद्रांमधील पाण्यावर प्रक्रिया करून ते इतर कामासाठी उपलब्ध करून देणारदिव्यावर योजनांची बरसातमागील कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामांचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या दिव्याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील नगरसेवकांची संख्याही २ वरून ११ वर गेल्याने सर्वच पक्षांचे याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यानुसार, आता शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात दिव्यावर अक्षरश: विविध योजनांचा पाऊस पडला आहे. दिवावासीयांची दिव्याची स्वतंत्र प्रभाग समिती, दिव्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद, दिवा परिसरात एनडीआरएफचा बेस कॅम्प, दिवा येथे नवीन अग्निशन केंद्र, दिवा येथील खाडीकिनाऱ्यावरील ५० एकर जागेत नेचर पार्क आदींसह विविध योजनांचा पाऊस पडला आहे.