शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने ठाण्याची लावली वाट; सामाजिक संघटनांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:46 IST

आनंद परांजपेंना दिला पाठिंबा

ठाणे : देशात २०१४ साली बहुमताने भाजपाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. २५ वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.ठाण्यात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, विश्वास उटगी, जगदीश खैरालिया, मतीन शेख आदी उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात आमचे प्रश्न ऐकून घेतले जायचे, त्यावर चर्चा व्हायची. या पाच वर्षांत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी सरकारदरबारी चर्चा झालेली नाही आणि झाली असलीच, तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. मोदी सरकारची सुरू असलेली वाटचाल लोकशाहीची हत्या आणि अभिव्यक्तीचे हनन करण्यासाठी आहे, असे वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युतीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील ४८ उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत आहोत, असे मत डॉ. संजय मं.गो. यांनी व्यक्त केले. ठाण्यात तरुणांची बेरोजगारी, एन्व्हॉयर्नमेंटल कन्सल्टंट, पाण्याची व्यवस्था आणि क्लस्टर हे प्रश्न असून आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी ते सोडवावे, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.सध्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे वळलेली आहेत. कामगार, शेतकरी एकूणच सर्वसामान्य जनता असुरक्षित आहे. नोटाबंदीमध्ये याच कामगार, शेतकरी, छोट्या दुकानदारांचे खूप नुकसान झाले आणि प्रत्यक्षात काळे पैसेवाल्यांचा फायदा झाला. आज हुकूमशाहीकडे जाणारी पावलं अर्थात काही दोनतीन माणसे जो निर्णय घेतात आणि संसदेला, सर्वोच्च न्यायालयाला टांगून ठेवतात, हे चुकीचं आहे. अजित डोवाल हे तर राष्ट्रीय सल्लागार आहेत की, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आहेत, हा एक प्रश्नच आहे, असे विश्वास उटगी म्हणाले.भ्रष्टाचारात अडकलेल्यास निवडून देऊ नकानंदलाल समितीच्या भ्रष्टाचारात राजन विचारे अडकलेले होते. त्यामुळे अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या माणसाला निवडून देऊ नये, असे जगदीश खैरालिया म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thaneठाणेShiv Senaशिवसेना