शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 07:34 IST

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

बदलापूर: बदलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. बदलापूर शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कडक लॉकडाऊनची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालिका कार्यालयात ठाण मांडले होते.बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, शासनाने ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली असताना आणि या मोहिमेमुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्याची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे हे शनिवारी सकाळपासून बदलापूर पालिकेच्या सभागृहामध्ये ठाण मांडून बसले. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, ही घोषणा गुरुवारी केल्यापासून पुजारी बदलापूर पालिकेत फिरकलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पुजारी येऊन आम्हाला स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे.आ. किसन कथोरे यांनी साधला शिवसेनेवर निशाणाबदलापूर शहरात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला असून, शिवसेनेने याला विरोध केला आहे. यावरून आता मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. फक्त ठेकेदारी बंद झाली म्हणून लॉकडाऊनला विरोध केला जात असल्याचा आरोप कथोरे यांनी केला.

शहरात आठवडाभराच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात -राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा या आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.

एकीकडे राज्य सरकार नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे, तर दुसरीकडे बदलापुरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉकडाऊन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढील सात दिवस शहरात कडक लॉकडाऊन असेल. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

बदलापूर शहरात लॉकडाऊन लागावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या निर्णयाला जिल्हाधिकार्‍यांनीही समर्थन दर्शवीत बदलापुरात कडक लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनसाठी कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने इतर पक्षांनी मात्र आता या कडक लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांचे होतील हाल - म्हात्रेकडक लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हे लॉकडाऊन रद्द करावे, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी पालिका सभागृहात ठाण मांडून आपला निषेध व्यक्त केला, तर पोलिसांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूर