शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र, भाजपाविरोधाची धार तीव्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:01 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती, काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, रिपब्लिकन पक्षांचे गट आणि कुणबी सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचा घेतलेला निर्णय यामुल्ळे ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राजकारण सध्या ढवळून निघाले

ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती, काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, रिपब्लिकन पक्षांचे गट आणि कुणबी सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचा घेतलेला निर्णय यामुल्ळे ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. भाजपाविरोध या एकककमी कार्यक्रमावर हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यातच श्रमजीवी संघटनेला शिवसेनेपासून तोडण्यात भाजपाला यश आले असले, तरी भिवंडी वगळता अन्य तालुक्यात त्याचा फारसा राजकीय परिणाम जाणवण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. उलट भिवंडी तालुक्यात त्यामुळे कधी नव्हे एवढी शिवसेना एकवटून कामाला लागल्याचे चित्र आहे.अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी असला तरी सोमवारपासूनच वेगवेगळ््या पक्षांची खलबते सुरू आहेत. तालुकानिहाय जागावाटपात बरेच तिढे असले, तरी भाजपाविरोध हा सर्वांचा एकमेव अजेंडा असल्याने या निवडणुका कधी नव्हे, इतक्या रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.अडीच वर्षे जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून दूर असलेल्या राजकीय पक्षांनी ग्रामीण भागात नवनवी समीकरणे अस्तित्त्वात आणल्याने या निवडणुकीतून नवे राजकारण उदयाला येण्याची चिन्हे आहेत. शेतकरी, त्यातही कुणबी समाजाला एकत्र करण्याचे प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यातही वेगगेवळ््या आंदोलनांचा फटका बसलेल्यांना एकत्र करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो यावर जिल्ह्याचे राजकारण कोणते वळण घेते ते स्पष्ट होईल. भिवंडी निवडणुकीपासून शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढली. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर सभांतून टीका केली असली, तरी स्थानिक राजकारणात या दोन पक्षांनी एकत्र येत नवा राजकीय घरोबा केला आहे. भाजपाची सर्व भिस्त भिवंडी तालुक्यावर आहे. तेथेच त्या पक्षाला वाढू न देण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे.सविस्तर/आतील पानांतश्रमजीवीचा मतदार फोडण्याचा प्रयत्न?आदिवासींच्या बळावर श्रजमजीवी संघटनेचे राजकारण सुरू आहे. वसई-विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांना विरोध करण्यासाठी विवेक पंडित यांनी शिवसेनेची साथ घेतली, पण ख्रिस्ती मते मिळावीत म्हणून ते कधी शिवसनेच्या चिन्हावर लढले नाहीत.त्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे स्थानिक आदिवासी नेत्यांची मदत घेत श्रमजीवीचा मतदार फोडण्याचा प्रयत्न या निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.सतत वेगवेगळ््या पक्षांशी सोबत केल्याने आदिवासींत असलेली नाराजी या निवडणुकीनिमित्ताने बाहेर काढण्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू आहे.ग्रामीण राजकारणाचा पोत बदलणार?ग्रामीण भागात आजवर एक पक्ष, एक चिन्ह, प्रसंगी एक समाज असे चित्र होते. यावेळी मात्र भाजपाविरोधासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याने या राजकारणाचा पोत बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असण्याची मतदारांना सवय होती.पण स्थानिक स्वराज्य संस्थांत अनेकदा या पक्षांनी वेगळी चूलही मांडली होती. आता मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे नवे राजकारण उदयाला आले आहे. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आजवर शिवसेनेसाठी मते मागत, पण आता त्यांना भाजपासाठी मते मागावी लागणार आहेत.कुणबी मतदार महत्त्वाचा : भाजपामध्ये आगरी समाजाचे प्राबल्य असल्याने त्या पक्षातील कुणबी नेते अस्वस्थ आहेत. त्यातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून या समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणातील आपला हिस्सा कमी होईल, अशी भीती या समाजात आहे. त्यामुळे यावेळी हा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. ग्रामीण भागात हा मतदार महत्त्वाचा आहे. त्यांच्या कुणबी सेनेने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षासोबत जाण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे.नवभाजपावादी चिडले : भाजपात सध्या निष्ठावान आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले नवभाजपावादी असे दोन गट पडले आहेत. नवभाजपावाद्यांना सढळ हस्ते उमेदवारी दिल्याने निष्ठावंत भाजपा नेत्यांनी वरपर्यंत दाद मागून काही ठिकाणी उमेदवार बदलायला लावले. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांविरोधात राष्ट्रवादीतही टोकाचे वातावरण असल्याने या उमेदवारांना भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील विरोधाचा सामना करावा लागतो आहे.याद्या आज घोषित होणार : भाजपाच्या बहुतांश उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरले. पण शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात अंतर्गत चर्चा सुरू असल्याने त्यांच्या मोजक्याच उमेदवारांनी अर्ज भरले. उरलेले सर्व उमेदवार मंगळवारी दुपारपर्यंत अर्ज भरतील. त्यातही ज्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळेल, तोच पक्षाचा अंतिम उमेदवार होईल. त्यातून नाराजी, बंडखोरी उफाळून येऊ नये म्हणून कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी घोषित केली नाही. मंगळवारी दुपारी तीननंतर यादीतील अंतिम उमेदवार स्पष्ट होतील. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस