दिवा पूर्वेतील नवीन तिकीट घराचे शिवसेनेकडून लोकार्पण

By अनिकेत घमंडी | Updated: April 15, 2023 18:07 IST2023-04-15T18:07:16+5:302023-04-15T18:07:38+5:30

दिवा पूर्वेतील प्रवाशांना मोठा दिलासा

Shiv Sena inaugurates new ticket house in Diva East shrikant shinde | दिवा पूर्वेतील नवीन तिकीट घराचे शिवसेनेकडून लोकार्पण

दिवा पूर्वेतील नवीन तिकीट घराचे शिवसेनेकडून लोकार्पण

डोंबिवली: दिवा पूर्वेला तिकीट घर व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दिवेकर रेल्वे प्रवाशांची होती. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकाळात दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला असून शनिवारी तेथील नव्या तिकीट घराचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा शिवसेनेचे प्रवक्ते, ठामपाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याहस्ते करण्यात आले.

दिवा स्थानकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी नवीन फलाटाचे, स्वयंचलित सरकत्या जिन्याचे काम, शौचालय, पाणपोई आदी कामं सुरू आहेत. दिवा पूर्वेला एकही तिकीट घर नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. दिवा पूर्वेला पाहिलं तिकीट घर झाल्याने रेल्वे प्रवासी संघटना आणि दिवेकर रेल्वे प्रवाशांनी खासदार शिंदें यांचे आभार व्यक्त केले. 

Web Title: Shiv Sena inaugurates new ticket house in Diva East shrikant shinde