शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही ठाण्यात शिवसैनिक उरणार नाहीत, कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:01 IST2022-06-30T11:59:29+5:302022-06-30T12:01:17+5:30

ठाण्यात शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ माजी नगरसेवकच नव्हे तर वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी शिंदे यांच्या मागे उभे  राहत आहेत. 

Shiv Sainiks will not be left in Thane to lock Shiv Sena branches, Meenakshi Shinde's mob after action | शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही ठाण्यात शिवसैनिक उरणार नाहीत, कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंचा टोला

शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही ठाण्यात शिवसैनिक उरणार नाहीत, कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंचा टोला

ठाणे: आम्ही शिवसैनिकच असल्याने आमच्यावर निलंबनाची कारवाई कशी केली जाऊ शकते,  अशाप्रकारे किती जणांवर कारवाई करणार, अशीच कारवाई होत राहिली तर एक दिवस ठाण्यात शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही कोणी शिवसेनेत उरणार नाही, असा टोला माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्याबद्दल नरेश म्हस्के यांच्यापाठोपाठ मीनाक्षी शिंदे यांनाही शिवसेनेनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.      
     
ठाण्यात शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ माजी नगरसेवकच नव्हे तर वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी शिंदे यांच्या मागे उभे  राहत आहेत. 

शिंदे समर्थकांनी ठाण्यात दोन वेळा शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भाग घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 
या कारवाईमुळे ठाण्यातील शिवसेना महिला वर्गात अस्वस्थता निर्माण झाली. शिवसेनेतील मंडळींवर हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या शिंदे यांना समर्थन दिले म्हणून अशाप्रकारची कारवाई होत असेल तर एक दिवस शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही कोणी उरणार नाही, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

Web Title: Shiv Sainiks will not be left in Thane to lock Shiv Sena branches, Meenakshi Shinde's mob after action