शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:29 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. 

ठळक मुद्देशिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आज आदरांजली वाहण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. धनंजय रायकर या वाहकाने महाराजांच्या जीवनावर रेखाटलेली रांगोळी प्रतिकात्मक महाराजांनी निरखून पाहिली.

कल्याण - शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आज आदरांजली वाहण्यात आली. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. 

बस डेपोच्या कार्यशाळेत भागवत राजेंद्र पाटील हे सहाय्यक कारागीर पदावर कार्यरत आहे. पाटील यांचे शिक्षण अंबरनाथ औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतून झाले आहे. पाटील हे उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात राहता. त्यांना शिवचरित्रची आवड आहे. त्या आवडीतूनच त्यांनी शिवबाची वेशभूषा परिधान केली. त्यांनी आज शिवजयंतीचे औचित्य साधून महाराजांची वेशभूषा परिधान केली. भगवा भरजरी अंगरखा, हाती तलवार घेऊन महाराज डेपोच्या पाहणीसाठी निघाली.

डेपोत धनंजय रायकर या वाहकाने महाराजांच्या जीवनावर रेखाटलेली रांगोळी प्रतिकात्मक महाराजांनी निरखून पाहिली. रायकर यांच्या रांगोळीला चांगली दाद दिली. तेव्हा रायकर यांनी चक्क महाराजांच्या सोबत सेल्फी काढला. महाराजांनी त्याठिकाणाहून आपला मोर्चा वळविला ते थेट शिवशाही या बसच्या दिशेने निघाले. ही शिवशाही बस नगरहून कल्याण डेपोत आली होती. त्या बसच्या वाहक चालकांची विचारपूस केली. त्यांना अगदी बरे वाटले. महाराजांनी डेपोच्या कार्यशाळेतील एका सहकाऱ्याच्या सोबतीने दुचाकीवरुन शिवाजी चौक गाठला. शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्य़ास प्रतिकात्मक शिवाजी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी पारनाका, गांधी चौकात फेरफटका मारला. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. शिवाजी चौकात अभिवादनासाठी आलेल्या तरुणांच्या हाती भगवे झेंडे पाहून प्रतिकात्मक शिवाजीचे मन भरुन आले. अनेक तरुणांनी शिवाजी महाराजांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद लूटला. 

व्हीडीओ पाठविला आहे.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkalyanकल्याणBus Driverबसचालक