निकालावरून शिंदे-ठाकरे समर्थक आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:11 IST2024-01-11T14:11:02+5:302024-01-11T14:11:56+5:30

उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत काळे झेंडे दाखवले.

Shinde Thackeray supporters face off over results | निकालावरून शिंदे-ठाकरे समर्थक आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

निकालावरून शिंदे-ठाकरे समर्थक आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

पालघर :- शिवसेना कोणाची या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल दिल्यावर पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या एकनाथ शिंदे गटासमोर उद्धव ठाकरे गटाने येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने गद्दार अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि आ.रवींद्र फाटक यांच्यासोबत फिरून नगरपरिषद जिंकून देणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आक्रमक व्यूहरचनेचा सामना करावा लागला.पालघर रेल्वे स्थानका कडून हुतात्मा स्तंभाजवळ जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गट आल्यावर आधीच जमलेल्या उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत काळे झेंडे दाखवले.

उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून गद्दार म्हणून हिणविण्यात आल्यावर दोन्ही बाजूने घोषणा बाजी सुरू झाली. हा सत्याचा विजय असल्याचे शिंदे गटाने सांगितल्यावर दोन्ही बाजूने आक्रमक भूमिका घेत दोन्ही गट एकमेकांना भिडले.अखेर पालघर पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण काहीसे निवळले.

Web Title: Shinde Thackeray supporters face off over results

टॅग्स :palgharपालघर