शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे बळ; ५० हजार कार्यकर्ते जाणार
By धीरज परब | Updated: October 4, 2022 18:53 IST2022-10-04T18:52:45+5:302022-10-04T18:53:17+5:30
पंडित यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे बळ; ५० हजार कार्यकर्ते जाणार
मीरारोड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे मोठे बळ मिळाले आहे. श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार श्रमजीवीचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आदिवासी भागात शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष असलेल्या विवेक पंडित यांची नियुक्ती शिंदे - भाजपा सरकारने कायम ठेवली आहे . शिवाय सदर अध्यक्ष पद हे पूर्वी राज्यमंत्री दर्जाचे होते त्याला आता मंत्री पदाचा दर्जा शासनाने ३ ऑक्टोबर रोजी शासन आदेश द्वारे दिला आहे.
पंडित यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट यांच्या दसरा मेळाव्या वरून चांगलीच चुरस लागली आहे. त्यातच श्रमजीवी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला ५० हजार श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पालघर, ठाणे, नाशिक, मुंबई, नंदुरबार, अकोला सह विविध भागातून श्रमजीवीचे कार्यकर्ते वांद्रे बीकेसी येथील मेळाव्याला येणार आहेत. त्यांच्यासाठी सुमारे १ हजार बस ची व्यवस्था करण्यात आली आहे . एकट्या मीरा भाईंदर मधून ५ हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची माहिती श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी दिली आहे.