शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:44 IST

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. 

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. 

नरेश म्हस्केंनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात हिरवा साप आणि दुतोंडी साप म्हणतात. ते रात्रीचे ट्विट करतात सकाळी डिलीट करतात रात्री त्यांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. लोकांची माथी भडकवण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे. जितेंद्र आव्हाड आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचे एवढा मातोश्रीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होते, असा दावा देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे. खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं, भूमिका मांडावी, असं आव्हान देखील नरेश म्हस्के यांनी दिलं आहे. 

...तर मी खेद व्यक्त करतो- जितेंद्र आव्हाड

प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे