शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:44 IST

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सेहगल यांना आमंत्रण पाठवून ते नंतर नाकारले, त्यावरून बराच वाद झाला होता. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत एका व्यक्तीने मला नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. त्यांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असा मेसेज पाठवला होता. त्यावर मग पु. भा. भावे कोण होते? त्यांचे भाषण पुण्यात उधळून लावले होते. तेव्हा कोणाला का पुळका आला नाही? असा प्रश्न पडला. डावे नेहमीच आपली सोय पाहतात, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.‘पै फेण्ड्स लायब्ररी’च्या सौजन्याने नावीन्य प्रकाशन प्रकाशित डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘राममंदिरच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री सभागृहात शनिवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अभिनेते मनोज जोशी डॉ. परीक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, पुंडलिक पै, नितीन खैर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शेवडे म्हणाले की, इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. पण ते आपल्याकडे होत नाही. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. गेली ७० वर्षे इतिहासकारांनी घोळ घालून ठेवला आहे. तो तसाच सुरू आहे. चार वर्षांत सध्याचे सरकार ही काही करू शकले नाही. या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. मीडियाला हे सरकार घाबरते की काय असे वाटते.परीक्षित शेवडे म्हणाले की, साहित्यातील संदर्भ पाहताना, संशोधन करीत असताना असे लक्षात येते की पुढच्या आवृत्तीमधील काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळण्यात आल्या आहेत. राजकारण हे खोलवर सुरू असते. मालिका हे इतिहास सांगण्याचे साधन नाही, पण त्यांचा बोलबोला जास्त आहे. शाळांमधूनही खरा इतिहास शिकविला जात नाही. जोशी म्हणाले की, राम या देशाची आस्था, श्रद्ध आणि या जगाचा प्राणवायू आहे. राम ज्यांच्यात नाही ते डावे आहेत आणि ज्यांच्यात राम आहे ते उजवे आहेत.वसीम रिझवी यांचा ‘रामजन्म भूमी’ यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरला गेला आहे. लवकरच तो तुम्हाला बघायला मिळेल. रिझवी यांची मुलाखतही या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुनावणीच्या विलंबास काँग्रेस जबाबदार!जोगळेकर म्हणाले की, जागृत जनमानस उभे राहिले तर रामजन्मभूमीवर राममंदिर बांधलेले दिसेल. भैय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर भाषणात २०२५ मध्ये मंदिर बांधलेले दिसेल. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीमधून असे पुरावे बाहेर येतील की जेणेकरून राममंदिराच्या बांधणीचा मार्ग खुला होईल.यांच्या या वक्तव्याचा काही जणांनी हे सरकार राममंदिर बांधणार नाही असा अर्थ काढला. या सुनावणी प्रक्रियेतील ललित न्यायमूर्ती यांना काढावे, असा अर्ज काँग्रेसने केला आहे.त्यामुळे सुनावणीला उशीर होत आहे. आता २९ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर