मौजमजेसाठी तिने स्वीकारला चोरीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:59 IST2018-10-16T23:59:01+5:302018-10-16T23:59:03+5:30
ठाणे : नवरा विदेशात कामाला असल्याने लक्ष्मी घरात नाचतच होती. त्याच्यावर मौजमजा सुरू असताना, नवरा-बायकोत भांडणे सुरू झाली. त्यातूनच ...

मौजमजेसाठी तिने स्वीकारला चोरीचा मार्ग
ठाणे : नवरा विदेशात कामाला असल्याने लक्ष्मी घरात नाचतच होती. त्याच्यावर मौजमजा सुरू असताना, नवरा-बायकोत भांडणे सुरू झाली. त्यातूनच नवऱ्याने अचानक पैसे पाठविणे बंद केले. त्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली. पैशांची अडचण दूर करण्यासाठी तिने रेल्वे प्रवासात चोरी करून बघितली. पहिली चोरी यशस्वी झाल्यानंतर एकापाठोपाठ एक चोºया सुरू झाल्या. अशाच एका चोरीत ठाणे लोहमार्ग पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यात ती सराईत चोर महिला अडकली आणि पैशांचा हव्यास तिला महागात पडला.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासादरम्यान सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यानुसार ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन त्याकडे लक्ष केंद्रित केले. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती हातेकर आणि अनिल सोनार यांनी मुंब्य्रातील अंजुम खान हीस सोनसाखळी चोरीप्रकरणी मुंब्य्रातूनच पकडले. तिने चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील १ लाख ३४ हजार ६७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये मंगळसूत्र आणि तीन सोन्याच्या चेनचा समावेश आहे.