पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई

By अजित मांडके | Updated: September 29, 2022 17:15 IST2022-09-29T17:15:08+5:302022-09-29T17:15:08+5:30

Shambhuraj Desai: पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्यात काम करणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी ठाण्यात केले

Shambhuraj Desai will follow in the footsteps of the Chief Minister as Guardian Minister | पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई

पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे यापूर्वीचे तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून काम केले. त्यामुळे पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्यात काम करणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी ठाण्यात केले. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शंभूराज देसाई हे प्रथमच गुरुवारी ठाण्यात आले असताना, त्यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

पुढे बोलताना,  मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करीन अशी ग्वाहीही दिली, तसेच देसाई यांनी ठाणे जिल्हा हा खूप मोठा आहे. येथे काम करताना मुख्यमंत्री शिंदे हे ज्या सूचना देतील आणि जी दिशा दाखवतील तसेच काम करीन असे म्हटले.

यावेळी देसाई यांना रश्मी ठाकरे याही गुरुवारी टेंभी नाका येथील देवीच्या दर्शन घ्यायला येणार आहेत. याबाबत विचारले असता . देवीचे दर्शन घ्यायला कोणालाच मनाई नाही. परंतु टेंभी नाक्याच्या देवीचा आशीर्वाद हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पहिल्यापासून राहिला आहे. आमची श्रद्धा आहे की यापुढेही आम्ही आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य करतो आहे. त्यालाही या देवीचा आशीर्वाद कायम राहील. याशिवाय, अंबादास दानवे यांनी केलेले वक्तव्य हे अंत दुर्दैवी आहे. आपण देवाकडे जातो ते गाऱ्हाणं घालण्यासाठी जातो किंवा मागणे मागायला जातो. त्यावेळी, देवाला सर्वांचे भल कर नंतर माझे भले कर असे आपण देवाजवळ प्रार्थना करतो. पण,दानवे यांची संस्कृती याच्यावरून स्पष्ट होते. कुणाचे तरी वाईट कर असे आपण गाऱ्हाणं घालत नाही. या त्यांच्या वक्तव्यावरून ते कुठल्या संस्कृती मधील आहेत हे आता स्पष्ट झाले आहेत अशी टीका पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी ठाण्यात केली. 

Web Title: Shambhuraj Desai will follow in the footsteps of the Chief Minister as Guardian Minister