शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधून बंटी-बबलीला अटक करण्यात शहापूर पोलिसांना आले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:44 IST

दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे.

भातसानगर/शहापूर : दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.शहापूरलगत असलेल्या चेरपोली येथील आशीषकुमार पोतदार व कुटुंबीय २१ आॅगस्टला अग्रसेन जयंतीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्याच वेळी घरकामासाठी असलेले परमबहादूर साही व त्याची बोगस पत्नी शांताबाई या नेपाळी दाम्पत्याने संधी साधून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल ११ लाख ६५ हजारांवर डल्ला मारून पोबारा केला.या चोरट्यांमधील जीवन चंद व गोरख शाही या दोघांना शहापूर पोलिसांनी कोपरखैरणे येथे जाऊन काही दिवसांपूर्वी अटक केली.तर, नेपाळी दाम्पत्यासह आणखी तिघे फरार होते. त्याचा शोध पोलीस घेत होते. त्यानंतर, शहापूरचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम, पोलीस हवालदार काशिनाथ सोनवणे, पोलीस नाईक नागरे, पोलीस शिपाई किरण गोरले आणि पोलीसमित्र राहुल राठोड या पथकाला नेपाळ येथे रवाना करण्यात आले.तब्बल एक महिना नेपाळमध्ये वास्तव्य केल्यानंतर ही घरफोडी उघडकीस आणण्यास शहापूर पोलिसांना यश आले.पोलिसांनी त्यांच्याकडील तब्बल ४१२ ग्रॅम सोने, ७०० ग्रॅम चांदी व दोन लाख रु पये भारतीय चलन जप्त केले आणि पदम बहादूर साही, बिरमादेवी, राजू कुवर, पूजा एनबहादूर सिंग व दरेंद्र एनबहादूर चंद या चौघांना मुद्देमालासह नेपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम नेपाळ पोलिसांकडे जप्त करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे शहापूर पोलिसांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, शहरात वाढणाºया चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकThiefचोरshahapurशहापूरPoliceपोलिस