शहापूर हादरले, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; गोळीबारात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 14:02 IST2024-12-22T14:00:47+5:302024-12-22T14:02:15+5:30
कसारा- शाम धुमाळ काल शनिवार रात्री शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स मधील दिनेशकुमार मोनाराम चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार ...

शहापूर हादरले, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; गोळीबारात एकाचा मृत्यू
कसारा- शाम धुमाळ
काल शनिवार रात्री शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स मधील दिनेशकुमार मोनाराम चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात दिनेश चौधरी या २५ वर्षीय तरुण गभीर जखमी झाला. पोटात गोळी लागल्याने जखमी दिनेशला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी दिनेश यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आले. दरम्यान, आज सकाळी दिनेश यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला .
आज या घटनेच्या निषेधार्थ शहापूर तालुका व्यापारी मंडळातर्फे घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यासाठी आज शहापूर बंद ची हाक देण्यात आली. आज च्या बंद ला शहापूर करांना नी उत्तम प्रतिसाद दिला. घटनेचा निषेध म्हणून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुक मोर्चा शहापूर पोलीस ठाण्याव्या आवरात आला तिथे मृत दिनेश यांना श्रद्धाजली वाहण्यात आली.
या मूक मोर्चात मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी उपस्थिती राहून व्यापारी मंडळाच्या मूक मोर्चात सहभागी झाले. यावेळी मूकमोर्चात तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी ,नेते व असंख्य व्यापारी ,नागरिक सामील झाले होते.
दरम्यान, गोळीबार नक्की कोणत्या हेतूने करण्यात आला. याबाबत शहापुर् पोलीस तपास करीत असून हल्ले खोरांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून शनिवारी रात्री घटनास्थली डॉग स्कॉड मार्फत तपास करण्यात आला आहे.