शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

ठाण्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून औरंगाबादेत लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:45 IST

नौपाडयातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुलाचा थेट औरंगाबाद येथून ठाणे पोलिसांनी शोध घेतला. मोबाईल घरातच ठेवून दोघेही पसार झाले होते. आईला त्याने फोन केल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.

ठळक मुद्देलग्नासाठी दोघांनीही घरातून नेले १२०० रुपयेमोबाईल घरीच ठेवलेआईला त्याने फोन केल्यानंतर लागला शोध

ठाणे : ठाण्याच्या नौपाडा भागातील एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून औरंगाबाद येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या भावेश अर्जून धोत्रे (१९, रा. नागोबाची वाडी, हरिनिवास सर्कल, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दोघेही एकाच परिसरात राहणारे. आधी केवळ तोंडओळख. नंतर व्हॉटसअ‍ॅपमुळे सलगी वाढली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर दहावीची परीक्षा होताच पळून जाण्याचा दोघांनी निर्णय घेतला. झालेही तसेच २२ मार्चला दहावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून ती घराबाहेर पडली. जातांना तिने मोबाईलही घरातच ठेवला. त्यामुळे तिचा काहीच संपर्क होत नव्हता. दिवसभर वाट पाहिल्यानंतर २३ मार्च रोजी तिच्या कुटूंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्येच त्यांनी भावेशवर संशय व्यक्त केला होता. पण, त्यानेही मोबाईल नेला नव्हता. त्यामुळे काहीच शोध लागत नव्हता. दरम्यान, त्याने २४ मार्च रोजी औरंगाबद येथील एका महादेवाच्या मंदीर परिसरातून घरी आईला ख्याली खुशालीचा फोन केला. तेंव्हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती आईने दिली. पण, तरीही आता लग्न केले असल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश राऊत यांच्या पथकाने औरंगाबद येथे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, तिथून तो निसटला. नंतर त्याच्या कुटूंबियांना विश्वासात घेऊन त्याला औरंगाबाद येथून आणण्याचे आवाहन पोलिसांनी केले. कुटूंबियांच्या आवाहनानंतर तो त्या मुलीसह औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे बुधवारी (२८ मार्च ) रोजी आला. तिथून त्याच्या कुटूंबियांच्याच मदतीने धुमाळ यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुखरुप सुटका केली. एका चिकन सेंटरमध्ये काम करणारा भावेश कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचा अंदाज घेऊन पोलिसांनी अत्यंत संयम आणि संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळून यशस्वीपणे तपास केला........................अवघ्या १२०० रुपयांमध्ये लग्नमुलीला लग्नासाठी मन वळविल्यानंतर तिने घरातून ५०० तर त्याने ७०० रुपये घेतले. हेच पैसे घेऊन त्यांनी औरंगाबाद गाठले. तिथे भटजी आणि दोघांच्याही नातेवाईकांशिवाय केवळ एकमेकांना हार घालून लग्न केल्याची कबुली त्याने दिली. मंदीर परिसरातच ते राहिले. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही माहिती तपासात उघड झाली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाRapeबलात्कार